Urine Problem : पावसात कमी पाणी पिऊनही वारंवार लघुशंका होते? जाणून घ्या काय आहे कारण

Urine Problem In Monsoon : पावसात सतत लघवीला होणे ही सामान्य समस्या असली तरी तिचा त्रास खूप होतो. सतत लघवीला जाऊ लागू नये म्हणून आपण पावसात कमी पाणी पितो. तरी देखील पावसात वारंवार लघवीला जावे लागते. 'या' मागचे नेमके कारण काय जाणून घेऊयात..
Urine Problem In Monsoon
Urine ProblemSAAM TV
Published On

पाऊस जसा आनंद घेऊन येतो तसाच पावसात अनेक समस्या देखील उद्भवतात. पावसात मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वांना भेडसावणारी समस्या म्हणजे वारंवार लघवीला जाणे. या समस्येवर प्रत्येकजण आपल्यापरिने उपाय काढतात. उदा. जास्त पाणी न पिणे, जास्त ओल्याव्यात न जाणे इत्यादी. पण एवढे करूनही पावसात सतत लघवीला का होते? जाणून घेऊयात तज्ञांकडून...

Urine Problem In Monsoon
Cardamom (Elaichi) Sharbat : आता कोणत्याही ऋतूत 'वेलची'च्या सरबतासोबत झटपट ताजेतवाने व्हा, रेसिपी जाणून घ्या..

तज्ञांच्या मते, पावसात सतत लघवीला होण्यामागे शरीराच्या इतर अनेक समस्या कारणीभूत ठरतात.

  • ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरची समस्या असल्यास तुम्हाला वारंवार लघवीला जावेसे वाटते. तसचे ही समस्या असलेल्या लोकांना लघवी रोखणे अशक्य होते.

  • युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन

मूत्रमार्गाच्या जागी संसर्ग झाल्यास सतत लघवीला जावे लागू शकते.

  • मधुमेह

मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांना पावसात लघवीचा त्रास अधिक जाणवतो. तसेच औषधांमुळे देखील वारंवार लघवीला होते.

  • ओटीपोट दुखी

सतत ओटीपोट दुखत असल्यास वारंवार लघवीला होऊ शकते. अशात लघवी रोखून ठेवणे खूप कठीण होते. जास्तवेळ लघवी रोखून ठेवल्यास डोकेदुखीचा त्रास सुरु होतो.

  • ताणतणाव

आजकालच्या धावपळीच्या जगात आपण सर्वच जण चिंतेने आणि ताणतणावाने वेढलेले आहोत. मेंदूवरील वाढत्या ताणामुळे लघवीला प्रेशर येऊ शकतो. वाढत्या तणावामुळे शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे देखील सतत लघवीला होऊ शकते.

  • पोषक तत्वांचा अभाव

आहारातील बदलांचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. यामुळे ताण वाढणे, भूक लागणे, वारंवार लघवीला जाणे इत्याही समस्या उद्भवतात. जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन केल्यास सतत लघवी होऊ शकते. शरीराला पोषण देणारे पदार्थ आहारात असावे.

  • पुरेशी झोप न होणे

वारंवार होणाऱ्या लघवी मागे आपली अपूरी झोप हे देखील कारण असू शकते. शरीर ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे.

सतत होणाऱ्या लघवीचा त्रास अनेक घरगुती उपाय करूनही थांबत नसेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या..

Urine Problem In Monsoon
Relationship Tips : लग्नानंतर सासू-सासऱ्यांसोबत 'असे' संबंध ठेवा, मग कधीच उडणार नाही तुमच्या नात्यात खटके..

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com