Diabetes Health : मधुमेह सायलेंट किलर आजार, किडनीवर कसा होतो परिणाम? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Diabetes and Chronic Kidney Disease : हल्ली मधुमेहाच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. ज्या व्यक्तींना मधुमेहाचा आजार असतो त्यांना किडनीची विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते.
Diabetes Health, Diabetes and Chronic Kidney Disease
Diabetes Health, Diabetes and Chronic Kidney DiseaseSaam Tv
Published On

Diabetes Affect Kidney Health :

हल्ली मधुमेहाच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो. ज्या व्यक्तींना मधुमेहाचा आजार असतो त्यांना किडनीची विशेष काळजी घ्यायला सांगितली जाते.

डायबेटिक किडनी (Kidney) डिसीज ज्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी असेही म्हणतात ही मधुमेहासंबंधीच ही अधिक गुंतागुंतीची मानली जाते. ज्यामुळे किडनीवर परिणाम करते. म्हणूनच याला "सायलेंट किलर" असे संबोधले जाते. यामध्ये रक्तातील साखरेची (Sugar) पातळी सतत वाढत जाणे, ज्यामुळे मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्यांचेही नुकसान होऊ शकते. यामुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते आणि मूत्रपिंडाच्या ऊतींना जखम होते.

मुंबईतील झायनोवा शाल्बी हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट आणि रेनल ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ रुजू गाला म्हणतात की, मधुमेह मूत्रपिंडाच्या आजाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे प्रोटीन्युरिया, म्हणजे मूत्रात प्रथिने आढळून येणे. इतर सामान्य लक्षणांमध्ये पाय किंवा चेहऱ्यावर सूज येणे, थकवा येणे आणि भूक मंदावणे यांचा समावेश होतो. हा रोग जसजसा वाढत जातो तसतसे, मूत्रपिंडाचे कार्य कमी झाल्यामुळे व्यक्तींना उच्च रक्तदाब आणि अशक्तपणा येऊ शकतो. मधुमेही लोकांमध्ये दीर्घकालीन किडनी रोगाचे प्रमाण ३०-४०% इतके जास्त आहे, ज्याला मधुमेही किडनी रोग असे म्हणतात.

Diabetes Health, Diabetes and Chronic Kidney Disease
Morning Health : ब्रश करण्यापूर्वी पाणी पिताय? या गोष्टी लक्षात ठेवा, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

1. उपचार पद्धत

मधुमेहाच्या (Diabetes) मूत्रपिंडाच्या आजारावरील उपचारांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे, रक्तदाबाचे व्यवस्थापन करणे आणि किडनीचे नुकसान कमी करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. मधुमेहाच्या किडनीच्या आजारामध्ये डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपण यांचा समावेश असू शकतो. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी त्यांच्या विशिष्ट गरजा आणि उपचारांकरिता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

2. प्रतिंबध कसे कराल?

डायबेटीक किडनी सारख्या समस्येला प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे आहे कारण हा मधुमेहाचा परिणाम अतिशय गंभीर आणि जीवघेणी गुंतागुंत निर्माण करणारा आहे. किडनी खराब झाल्यानंतर, रक्त योग्यरित्या फिल्टर करण्याची त्यांची क्षमता धोक्यात येते, ज्यामुळे शरीरात कचरा आणि द्रव साठते.

Diabetes Health, Diabetes and Chronic Kidney Disease
सकाळी उठताच बॉडीमध्ये दिसताय ही लक्षणे? असू शकते High Blood Pressure ची समस्या, वेळीच घ्या काळजी

उच्च रक्तदाबामुळे देखील किडनी निकामी होऊ शकते. डायबेटीक किडनीची समस्येवर उपचार करणे आव्हानात्मक ठरु शकते आणि अनेकदा डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपण यांसारख्या उपचारांची आवश्यकता भासते. रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलच्या योग्य व्यवस्थापनाद्वारे प्रतिबंध करण्यावर लक्ष केंद्रित केल्याने ही दुर्बल स्थिती विकसित होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो. डायबेटीक किडनीची समस्या टाळण्यासाठी वेळीच उपचार करणे तसेच किडनीची कार्यक्षमता टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

3. प्रतिबंधात्मक उपाय कोणते?

किडनीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. वेळोवेळी तपासणी केल्याने तुम्हाला रक्तातील साखरेच्या पातळीतील वाढ किंवा ओळखण्यात मदत होऊ शकते. किडनीचे नुकसान आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यासाठी तुमची HbA1c पातळी 7% च्या खाली असेल याची खात्री करा.

Diabetes Health, Diabetes and Chronic Kidney Disease
मधुमेहींनो, स्वयंपाकघरातील हा मसाला Blood Sugar वर रामबाण; रिकाम्या पोटी प्यायल्याने मिळेल आराम

फळे, भाज्या, तृणधान्य आणि कडधान्ये यांसारख्या पौष्टिक पदार्थांची निवड करून आपल्या आहाराकडे लक्ष द्या. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि उच्च सोडियमयुक्त अन्नाचे सेवन मर्यादित करा कारण ते मूत्रपिंडाचे कार्य बिघडवू शकतात आणि त्यामुळे वजनही वाढू शकते.

आहारतज्ज्ञांशी सल्ला घेतल्याने तुमच्या आहाराच्या गरजेनुसार आणि किडनीच्या आरोग्यास योग्य अशी आरोग्य योजना राखण्यास मदत होऊ शकते. मधुमेह आणि किडनी रोग दोन्ही व्यवस्थापित करण्यासाठी शारीरिकरित्या सक्रिय राहणे महत्वाचे आहे. नियमित व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी प्रभावीपणे नियंत्रित करण्यात मदत होते.

दिवसातून किमान 30 मिनिटे चालणे, जिमला जाणे, पोहणे किंवा सायकल चालवणे यासारख्या व्यायामांचा सराव करा जेणेकरून आरोग्यासंबंधीत तक्रारींपासून दूर राहता येईल आणि मधुमेहाच्या मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे कमी करता येतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com