Beauty Hacks : एमर्जंसीमध्ये उपयोगी पडणारे ब्युटी हॅक्स; प्रत्येक मुलीला 'या' ट्रिक्स माहितच असाव्यात

Beauty Tips : बऱ्याचदा वेळ कमी असल्याने झटपट सुंदर आणि छान तायर होता येत नाही. त्यामुळे अशावेळी मेकअप कसा करायचा याचे काही हॅक्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
Beauty Tips
Beauty HacksSaam TV
Published On

केसांना तेल आहे, या कारणामुळे अनेक मुली बाहेर फिरण्याचा प्लान कॅन्सल करतात. कधी कधी अचानक प्लान झाल्यावर ऐनवेळी काय करावे सुचत नाही. अचानक स्किन ऑइली होते. तर बऱ्याचदा वेळ कमी असल्याने झटपट सुंदर आणि छान तायर होता येत नाही. त्यामुळे अशावेळी मेकअप कसा करायचा याचे काही हॅक्स आम्ही तुमच्यासाठी आणले आहे.

कन्सीलर विथ मॉइश्चरायझर

बाहेर अचानक फिरण्याचा प्लान झाला की मेकअप करताना झटपट फाउंडेशन अप्लाय करता येत नाही. कारण फाउंडेशन सेट व्हायला जास्त वेळ लागतो. अशावेळी आधी कन्सीलर आणि मॉइश्चरायझर थोडं मिक्स करून घ्यावं. त्यानंतर हेच मिश्रण चेहऱ्यावर अपल्याय करत जा. ब्लेंडरच्या सहाय्याने तुम्ही चेहऱ्यावर संपूर्ण प्रोडक्ट ब्लेंड करून घेऊ शकता.

Beauty Tips
Ayurvedic Beauty Tips : महागड्या क्रिम आणि लोशनला करा बायबाय; वाचा स्वस्तात मस्त आयुर्वेदिक ब्युटी टिप्स

कोरडा शॅम्पू

काहीवेळा फिरण्याचा प्लान होतो तेव्हा केसांना तेल असतं. आता केस धुवून ते वाळवून सेट करण्यासाठी १ तास तर लागतोच. आता तुमच्याकडे यासाठी वेळ नसेल तर पर्समध्ये नेहमी एक ड्राय शॅम्पू ठेवा. ड्राय शॅम्पू केसांवर अप्लाय केल्यानंतर केस अगदी धुवून कोरडे केल्यासरखे स्मुथ आणि सिल्की होतात.

ब्लशर

मेकअपमध्ये ब्लश प्रत्येक मुलीला हवं असतं. अशात ऐनवेळी तुमच्याकडे ब्लशनर नसेल तर चिंता करू नका. अशावेळी तुम्ही लिपस्टीकचा वापर ब्लशरसाठी करू शकता. त्यासाठी आधी लिपस्टीकमध्ये थोडा नॉर्मल पावडर मिक्स करा. त्यानंतर गालांवर हे अप्लाय करा आणि ब्लेंड करा.

आयब्रो

मेकअप केल्यावर तो अॅटरॅक्टीव दिसण्यासाठी जाड आणि शार्प आयब्रो हवे असतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा असे आयब्रो हवे असतील तर तु्म्ही व्हाइट वॅस्लीन यासाठी वापरू शकता. आयब्रो पेन्सील किंवा ब्रशच्या सहाय्याने वॅस्लीन तुमच्या भुवयांवर अप्लाय करा. त्याने लूक आणखी सुंदर होईल.

हेअर कर्ल

बऱ्याच मुलींचे केस अगदी स्ट्रेटनींग केल्यासारखे स्टेट असतात. मात्र त्यांना कुरळे किंला कर्ल्स असलेले केस आवडतात. आता तुम्हाला सकाळी पहाटे लवकर एखाद्या कार्यक्रमाला जायचे असेल तर सकाळी केस कर्ल करणे कठीण असते. त्यामुळे रात्री झोपतानाच केसांचे बारीक सेक्शन घ्या आणि त्याची वेणी घाला. सकाळी उठल्यावर वेणी सोडल्यानंतर संपूर्ण केसांमध्ये कर्ल्स दिसतील.

Beauty Tips
Beauty Skin Tips : रखरखत्या उन्हात मेकअप मेल्ट होतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा, घाम आला तरी स्किन ग्लो करेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com