Skin Problems: चेहऱ्यावर आघात झाल्यावर कसे कराल उपचार? जाणून घ्या डॉक्टरांकडून

Skin Allergies: दररोज काम करताना आपल्याला काळजी घ्यायला हवी. स्वयंपाकघरात काम करताना कधीही लहान - मोठा अपघात होऊ शकतो. यात भाजणे, जखम होणे आणि हात कापण्याची समस्या होते.
Skin Problems
Skin ProblemsSaam Tv

रोजच्या जीवनात काम करताना आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी. रोज काम करत असताना अनेकदा आपल्याला इजा होऊ शकतात. अगदी लहान लहान गोष्टी यासाठी कारणीभूत असतात. जसे की स्वयंपकाघरात काम करताना भाजणे, जखम होणे. तसेच अनेकदा आपण वेंधळेपणात पडतो तेव्हा चेहऱ्याची त्वचा निघणे, फ्रॅक्चर होते. याचसोबत डोळ्यांनादेखील दुखापत होऊ शकते. चेहऱ्याच्या हाडांमध्ये चेहऱ्याचे फ्रॅक्चर होतात, जसे की जबडा, नाक आणि डोळ्याचे सॉकेट्स. मॅक्सिलोफेशियल जखमांवर योग्य तसेच वेळीच उपचार न केल्यास गंभीर समस्या होऊ शकतात. याचे परिणाम काही काळानंतर दिसतात.

अपघात किंवा काही खेळादरम्यान झालेल्या दुखापती असू शकतात. रस्त्यावरील चारचाकी अपघातामुळे चेहऱ्याला गंभीर दुखापत होऊ शकते.. कारण बऱ्याचदा लोकं त्यांचे सीटबेल्ट लावत नाहीत किंवा सुरक्षितपणे वाहन चालवण्याच्या नियमांचे पालन करत नाहीत. बऱ्याचदा कारचे नुकसान झाले नाही तरी त्याच्या आतील व्यक्तींना त्रास होऊ शकतो.

चेहऱ्यावरील आघातामुळे अनेक लक्षणे आढळून येऊ शकतात ज्याकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे. त्वचा कापली जाणे, जखम किंवा सूज यासारख्या शारीरिक लक्षणांव्यतिरिक्त काही व्यक्तींना त्यांचा जबडा हलवण्यात किंवा तोंड पूर्णपणे उघडण्यात अडचण येऊ शकते. या निर्बंधामुळे प्रभावित क्षेत्राभोवती वेदना आणि सवंदनशीलता भासू शकते, ज्यामुळे खाताना किंवा बोलताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये, चेहऱ्यावरील आघात हे डोळ्याच्या क्षेत्राजवळील नुकसानीमुळे दृष्टीत व्यत्यय आणू शकतात.

Skin Problems
Girls Solo Trip : कुछ तुफानी करेंगे..! महिलांनो सोलो ट्रिपसाठी व्हा तयार, भारतातील 'ही' ठिकाणे आहेत सुरक्षित आणि भन्नाट...

चेहऱ्यावरील आघाताकडे दुर्लक्ष करु नका

चेहऱ्यावरील आघात हा सहसा तुमच्या जीवनाला धोका नसतो, परंतु तो गुंतागुंतींशी संबंधित असतो. जर तुम्ही याकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तर दीर्घकाळाकरिता ते विकृत ठरु शकतात आणि यामुळे तुमच्या आरोग्यामध्ये आणि तुमच्या चेहऱ्याच्या स्वरूपामध्ये नक्कीच समस्या निर्माण होतात.

निदान कसे कराल?

निदानाचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे रेडियोग्राफी, क्ष-किरणांचा वापर. सामान्यतः हाडांना दुखापत होते, म्हणून त्यांची प्रथम तपासणी केली जाते. चेहऱ्यावरील आघातांचे सर्व परिणाम शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सीटी स्कॅनद्वारे चेहऱ्यावरील आघात शोधणे. सीटी स्कॅन (कॉम्प्युटेड टोमोग्राफी स्कॅन) तुमच्या चेहऱ्याच्या संपुर्ण हाडांची चाचणी करता येऊ शकते ज्यामध्ये प्रत्येक फ्रॅक्चर झालेले हाड स्पष्टपणे दिसते.

चेहऱ्यावरील आघातांवर उपचार कसे कराल

या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये प्लॅस्टिक पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तंत्रांचा वापर केला जातो ज्यामध्ये प्राथमिक उपचार किंवा ड्रेसिंगच्या तंत्रापासून ते त्वचेचे कलम, टिश्यूचा विस्तार होतो. पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियांमध्ये चेहऱ्याचे न बरे झालेले फ्रॅक्चर किंवा चेहऱ्यावरील अस्थिभंगांवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा चेहऱ्यावरील विषमतेवर उपचार करण्यासाठीच्या तंत्रांचा समावेश होतोजसे की, मॅक्सिलरी किंवा फ्रंटल हाडाचे फ्रॅक्चर.

डॉ देबराज शोम, कॉस्मेटिक सर्जन आणि संचालक - द एस्थेटिक क्लिनिक यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Skin Problems
World Day Against Child labour: १४ वर्षांखालील मुलाला कामावर ठेवल्यास होऊ शकते कारावासाची शिक्षा; देशात सर्वात जास्त बालमजुर कुठे?जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com