Patna Latest News : डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरने शस्त्रक्रिया केल्याचा आरोप; ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू

bihar Patna Latest News : नर्सिंग होममध्ये डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरने शस्त्रक्रिया केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली,
डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरकडून शस्त्रक्रिया; ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू
HospitalSaam tv

पाटणा: बिहारच्या पाटण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटणामधील पूर्णिया नर्सिंग होममध्ये डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरने शस्त्रक्रिया केल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली, असा गंभीर आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, कंपाऊडरने ऑपरेशन थेटरमध्ये नेलं. त्यानंतर औषधाचा डोस दिला. त्यामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. ६२ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर प्रेतासहित त्यांच्या कुटुंबीयांनी नर्सिंग होमच्या बाहेर आंदोलन केलं.

डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरकडून शस्त्रक्रिया; ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू
Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

'कंपाऊंडरने रुग्णाला मृत घोषित करण्यापूर्वी व्हेटिंलेटरवर ठेवलं होतं, असा आरोप शशी कुमार भगत यांनी केला. कुटुंबीय लेखी तक्रार देण्यास नसल्याने पोलिसांनी डॉक्टर आणि कंपाऊडरची सविस्तर माहिती दिली नाही.

धक्कादायक ! डॉक्टर शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या शरीरातून कापड काढण्यास विसरले

कर्नाटकातील कोलार येथील सरकारी रुग्णालयात २० वर्षीय महिलेची प्रसुती करण्यात आली. मात्र, काही दिवसांनंतर या महिलेच्या पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे प्रसुतीनंतर काही दिवसांनी या महिलेच्या आनंदावर विरजण पडले.

पोटात वेदना होऊ लागल्याने महिला डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी या महिलेला मलम दिला. त्यानंतर महिलेच्या घरातील सदस्यांनी मलम लावायला सुरुवात केली. त्यावेळी महिलेच्या योनी मार्गात कपड्याचा तुकडा दिसला. कपडा पाहून कुटुंबातील सदस्याला धक्का बसला. त्यानंतर कुटुंबातील सदस्याने सावधपणे कपडा बाहेर काढला. त्यावेळी हा कपडा ३ फूट असल्याचे समजले.

डॉक्टरच्या गैरहजेरीत चक्क कंपाऊडरकडून शस्त्रक्रिया; ६२ वर्षीय रुग्णाचा मृत्यू
Pune Crime News: पुण्यामध्ये पुन्हा 'मुळशी पॅटर्न'चा थरार, भरचौकात ६ जणांनी तरुणाची केली निर्घृण हत्या

या महिलेच्या पतीने सांगितले की,'सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रसुतीवेळी रक्तस्त्राव टाळण्यासाठी कापड्याचा वापर केला होता. मात्र, रुग्णालयातील डॉक्टर योनी मार्गातून कपडा काढायचे विसरले. या निष्काळपणाविरोधात जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com