Ragi Halwa Recipe : आरोग्यासाठी पौष्टिक अन् हेल्दी नाचणीचा हलवा, झटपट बनेल; पाहा रेसिपी

Ragi Benefits : नाचणी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यास भूक लागत नाही. नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामध्ये 100gm मध्ये साधारण 364 mg कॅल्शियम असते.
Ragi Halwa Recipe
Ragi Halwa RecipeSaam Tv
Published On

How To Make Ragi Halwa :

जेवल्यानंतर अनेकांना गोड पदार्थ खाण्याची आवड असते. परंतु, वाढत्या मधुमेहाच्या आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहावी यासाठी अनेकजण गोडाचे पदार्थ खाणे टाळतात. पण जर तुम्हालाही गोड पदार्थ खायचे असतील तर सोपी रेसिपी ट्राय करु शकता.

नाचणी ही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याचे सेवन केल्यास भूक लागत नाही. नाचणी ही कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत मानला जातो. यामध्ये 100gm मध्ये साधारण 364 mg कॅल्शियम असते. हाडांचे आरोग्य (Health) सुधारण्यासाठी, कॉलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. जर तुम्हाला देखील गोडाचा पदार्थ खायचा असेल तर नाचणीचा हलवा ट्राय करु शकता पाहूया झटपट बनणारी रेसिपी (Recipes).

1. साहित्य

  • नाचणीचे पीठ - १/२ वाटी

  • पीठी साखर - ४ चमचे

  • शुद्ध तूप - १ चमचा

  • पाणी - १/२ ग्लास

  • बारीक चिरलेला सुका मेवा - १ चमचा

  • दूध (Milk)

2. कृती

  • सर्वात आधी नाचणीचे पीठ घेऊन पॅनमध्ये चमचाभर शुद्ध तूप घाला. नंतर त्यात नाचणीचे पीठ चांगले भाजून घ्या.

  • पीठ हलके तपकिरी रंगाचे झाल्यास त्यात पाणी, दूध घालून हलवा घट्ट होईपर्यंत शिजवा.

  • त्यात थोडी पीठी साखर घालावी. यानंतर त्यात बारीक चिरलेले बदाम, काजू, पिस्ता घाला.

  • गरमागरम सर्व्ह करा हेल्दी आणि पौष्टिक असा नाचणीचा हलवा. मुले देखील आवडीने खातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com