Crispy Masala Dosa Recipe : पहिल्यांदाच मसाला डोसा बनवताय? मग ही सोपी रेसिपी एकदा वाचाच

Authentic South Indian Healthy Breakfast Recipe for Beginners : साउथ इंडियन पद्धतीने कुरकुरीत मसाला डोसा बनवा. ही सोपी आणि झटपट रेसिपी नवशिक्यांसाठी उपयुक्त असून आरोग्यदायी नाश्त्यासाठी परफेक्ट आहे.
Masala Dosa
Crispy Masala Dosa Recipegoogle
Published On

रोज चहा चपाती, कांदे पोहे, उपमा, शिरा, डोसे , इडली असे अनेक पदार्थ आपण नाश्त्याला खातो. नाश्ता हा पौष्टीक आणि हलका फुलका असला तर तब्बेतीसाठी फायदेशीर असतं. पण तुम्ही जर पहिल्यांदाच हे पदार्थ बनवत असाल तर ते अनेकदा फसतात. त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे डोसा आहे. डोसा तुम्ही गोल आकारात आणि व्यवस्थित केला नाहीत तर त्याची चव बिघडते. पुढे आपण नवशिक्यांसाठी डोसा बनवण्याची सोपी आणि साउथ इंडियन पद्धत शिकणार आहोत.

Masala Dosa
Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीसाठी स्पेशल! प्रसादाला बनवा 'हे' झटपट अन् स्वादिष्ठ पदार्थ

तुम्हाला पहिल्यांदाच डोसा बनवायचा असेल आणि तोही चवीष्ठ कुरकुरीक मसाला डोसा मग खास दक्षिण भारतीय पारंपारिक पद्धतीने तर पुढे दिले साहित्य आणि कृती व्यवस्थित फॉलो करा.

कुरकुरीत मसाला डोसा साउथ इंडियन स्टाईल रेसिपी (Crispy Masala Dosa South Indian Style Recipe)

डोसा तयार करण्याचे साहित्य

उडीद डाळ १ कप

तांदूळ २ कप

मेथी दाणे अर्धा चमचा

पाणी

मीठ

तेल

डोश्याचा मसाला करण्यासाठी लागणारे साहित्य

३ उकडलेले बटाट

कांदा १ चिरलेला

उडीद डाळ १ चमचा

मोहरी १ चमचा

कढीपत्ता

हळद

हिरवी मिरची

मीठ

तेल

लिंबाचा रस

सजावटीसाठी किसलेलं ओलं खोबरं

बटाट्याचा मसाला रेसिपी

तुम्ही सर्व प्रथम एका कढईत तेल घाला. तेल तापलं की, त्यात मोहरी १ चमचा , कढीपत्ता घाला. कांदा १ चिरलेला, उडीद डाळ १ चमचा घाला. आता त्यात हळद, हिरवी मिरची, मीठ घाला. शेवटी त्यात ३ उकडलेले बटाट बारिक करून छान परतून घ्या. सजावटीसाठी किसलेलं ओलं खोबरं वापरा.

पहिली स्टेप

बॅटर योग्य प्रकारे आंबवलत तरच तुमचे डोसे कुरकुरीत बनतील. त्यासाठी डाळ तांदूळ एकत्र भिजवून ७ ते ९ तास झाकून ठेवा. मग मिक्समध्ये याचे वाटण करून घ्या. तुम्ही जेव्हा डोसे बनवाल तेव्हा त्यात मीठ आणि पाणी घालायला विसरू नका.

दुसरी स्टेप

तवा मध्यम आचेवर गरम करा. मग त्यावर पाणी टाकून पुसून घ्या. नंतर तेल लावा आणि मग डोसा एका गोल आकाराच्या चमच्याने पसरवा. बॅटर थोडंसं पातळ असावं. झाकण न ठेवता डोसा शेकवा. एक-दोन थेंब बटर किंवा तेल घाला. बटाट्याचा मसाला थोडा गरम असावा. डोशावर पसरल्यानंतर लगेच फोल्ड करा. तयार आहे तुमचा कुरकुरीत डोसा.

Masala Dosa
Ambedkar Jayanti 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एकूण किती पदव्या होत्या?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com