WhatsApp Web safety : तुमचे WhatsApp चॅट कोणी वाचू शकणार नाही, फक्त करा 'ही' सेटिंग अ‍ॅक्टिव्ह

WhatsApp Tips : WhatsApp Web वापरताना सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. WhatsApp Web वरून लॉगआउट करणे आणि ब्राउजरवर पासवर्ड लॉक लावणे ही उपयुक्त सुरक्षा टिप्स आहेत.
WhatsApp Message safety
WhatsApp Web safetySaam Tv
Published On

बऱ्याच ऑफीसमध्ये WhatsApp वेबचा वापर करावाच लागतो. त्यासाठी तुम्हाला तुमचे पर्सनल WhatsApp सुद्धा लॉगिन करावे लागू शकते. अशावेळेस तुमचे काही पर्सनल चॅट इतरांना दिसतात. तुम्हाला तुमचे चॅट प्रायव्हेट ठेवायचे असतील आणि WhatsApp सुद्धा वापरायचे असेल तर तुम्ही पुढील फीचरचा वापर करू शकता.

WhatsApp Message safety
Airplane Facts : आपत्कालीन परिस्थितीत विमानात काय काळजी घ्यावी?

WhatsApp मध्ये सतत नवे बदल होत असतात. आता हीच कंपनी तुमचे चॅट प्रायव्हेट ठेवण्यासाठी काही फिचर देत आहे. तुम्ही जर गुगल क्रोमवर WhatsApp वेब वापरत असाल तर तुम्ही तुमचे मेसेज सहजपणे लपवू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही App डाउनलोड करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त गुगल क्रोम एक्सटेंशन डाउनलोड करायचे आहे. पुढे आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स दिल्या आहेत. त्याची स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

स्टेप १

गुगल क्रोमवर गुगल वर क्लिक करा.

स्टेप २

तिथे तुम्हाला WhatsApp वेबसाठी प्रायव्हसी एक्सटेंशन शोधावे लागेल.

स्टेप ३

आता तुमच्यासमोर एक पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला उजव्या बाजूला Add To chrome पर्याय दिसेल तो निवडा.

स्टेप ४

पुढे एक पॉप अप दिसेल. त्यामध्ये अॅड एक्सटेंशनवर क्लिक करा.

स्टेप ५

आता एक्सटेंशन क्रोममध्ये अॅड होईल.

प्रायव्हेट ब्राउजर विंडो (Incognito Mode) वापरा. त्यामध्ये Chrome: Ctrl + Shift + N या बटनावर क्लिक करा. यामुळे तुमचे चॅट सेशन ब्राउजरमध्ये सेव्ह होत नाही. तसेच Logout करणे विसरू नका. काम झाल्यावर WhatsApp Web वर Logout करायला विसरू नका. Browser वर पासवर्ड लॉक लावा. यामुळे WhatsApp Web उघडताना पासवर्ड लागेल. WhatsApp Web साठी सध्या "Hide Chat" हे फीचर नाही, पण तुम्ही पिन न करता, Archive Chat करू शकता. हे Archived चॅट Web वर पण दिसणार नाही जोपर्यंत नवीन मेसेज येत नाही.

WhatsApp Message safety
Methi Ghavane Recipe : गरमा गरम घावण्यांसोबत मेथीचा स्वाद, पौष्टीक घावण्याची रेसिपी लगेचच करा नोट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com