Saam Tv
तांदूळ, मेथीची पानं चिरलेली, हिरव्या मिरच्या, जिरं, आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ, तेल इ.
तांदूळ ५ ता भिजत ठेवून मग त्याचे वाटण करून घ्या.
वाटणामध्ये मेथीची पानं, मिरच्या, जिरं, आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ घाला.
पीठ सैलसर होईपर्यंत पाणी टाकून मिसळून घ्या.
नॉन-स्टिक पॅन गरम करा. त्याला तेल लावा.
एक पळी पीठ तव्यावर पसरवा आणि पातळ लेयर ठेवा.
झाकण ठेवून दोन्ही बाजूनी शेकवा आणि खरपूस घ्या.
साजूक तूप किंवा चटणीसोबत गरमा गरम मेथी घावणे सर्व्ह करा.