Rat Control Tips : उंदरांचा सुळसुळाट झालाय का? न मारता घरातून बाहेर काढण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घ्या

घरात उंदरांचा वावर वाढल्यास घराचे मोठे नुकसान होते, तसेच आजारांचा धोकाही निर्माण होतो. त्यामुळे उंदरांना कोणतीही इजा न पोहोचवता आणि न मारता घरातून पळवून लावण्यासाठी हे काही सोपे व प्रभावी उपाय नक्की करून पाहा.
Simple Tricks to Keep Rats Away from Your Home Permanently
Simple Tricks to Keep Rats Away from Your Home PermanentlySAAM TV
Published On: 

घरात उंदरांचा वावर म्हणजे अत्यंत त्रासदायक गोष्ट आहे. उंदीर केवळ खाण्या-पिण्याच्या वस्तूंचे नुकसान करत नाहीत, तर कपाटातील कपडे, फर्निचर आणि विजेच्या तारांचेही नुकसान करतात. याशिवाय, उंदरांमुळे घरात घाण पसरते आणि आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे लोक उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. जर तुमच्याही घरात उंदीर असतील आणि तुम्हाला त्यांना न मारता घराबाहेर काढण्याचा मार्ग हवा असेल, तर जाणून घ्या हे प्रभावी मार्ग.

घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या

उंदरांना घरापासून लांब ठेवण्यासाठी सर्वात आधी स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्वयंपाकघरात अन्नाचे तुकडे पडू देऊ नका आणि रात्री झोपण्यापूर्वी किचनची स्वच्छता नक्की करा. धान्य, बिस्किट आणि इतर खाण्याच्या वस्तू हवाबंद डब्यात ठेवा. कचराकुंडीही झाकून ठेवा आणि ती नियमितपणे साफ करा.

घरातील छिद्रे आणि भेगा बंद करा

स्वच्छता करूनही जर घरात वारंवार उंदीर येत असतील, तर त्यांच्या येण्याचे रस्ते बंद करणे आवश्यक आहे. यासाठी घरातील कानाकोपरा नीट तपासा. जर भिंतींजवळ, पाईप्सच्या आसपास किंवा दरवाजांजवळ काही छिद्रे किंवा भेगा असतील, तर त्या त्वरित बुजवून टाका. घरातील ड्रेनेज किंवा मोऱ्यांच्या तोंडावर स्टिलची जाळी बसवून घ्या, जेणेकरून उंदरांचा घरात येऊ शकणार नाहित.

Simple Tricks to Keep Rats Away from Your Home Permanently
Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

एसेंशियल तेलाचा वापर करा

उंदरांना न मारता पळवून लावण्यासाठी तुम्ही निलगिरी, पेपरमिंट आणि लवंगेच्या तेलाचा वापर करू शकता. उंदरांना या तेलाचा उग्र वास अजिबात आवडत नाही. तुम्ही कापसाच्या बोळ्यावर यापैकी कोणत्याही तेलाचे काही थेंब टाकून घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये किंवा जिथे उंदीर सगळ्यात जास्त येतात त्या ठिकाणी ठेवू शकता. यामुळे उंदीर त्या जागी परत कधीही येणार नाहीत.

तिखट लाल मिरची पावडरचा वापर

उंदीर मिरचीच्या वासापासूनही दूर पळतात. यासाठी तुम्ही पाण्यात थोडे लाल मिरची पावडर मिसळून त्याचे घरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रे करू शकता. मात्र, हा उपाय करताना विशेष काळजी घ्या. जर घरात लहान मुले किंवा पाळीव प्राणी असतील, तर हा उपाय टाळा.

Simple Tricks to Keep Rats Away from Your Home Permanently
Fatty liver warning signs: सतत थकवा आणि पोट जड वाटतंय? पुरुषांमध्ये फॅटी लिव्हरची दिसून येतात ही 5 गंभीर लक्षणं

डांबराच्या गोळ्यांचा वापर

डांबराच्या गोळ्यांच्या उग्र वासामुळेही उंदीर दूर पळून जातात. यासाठी तुम्ही घरातील वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये डांबराच्या गोळ्या ठेवू शकता. अशा प्रकारे, या काही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेऊन आणि प्रभावी उपायांचा अवलंब करून घरातील उंदीरांना घरापासून लांब ठेउ शकता .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com