Fatty liver warning signs: सतत थकवा आणि पोट जड वाटतंय? पुरुषांमध्ये फॅटी लिव्हरची दिसून येतात ही 5 गंभीर लक्षणं

Fatty liver symptoms in men: पुरुषांमध्ये फॅटी लिव्हरचा धोका वाढण्यामागे वाढते वजन, मधुमेह आणि इन्सुलिन यांसारखी कारणं असू शकतात. सतत थकवा, पोटाच्या उजव्या बाजूला अस्वस्थता आणि भूक कमी लागणे यांसारख्या तक्रारींकडे लक्ष द्या आणि वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Fatty liver warning signs
Fatty liver warning signssaam tv
Published On: 

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि राहणीमान बदललंय. याचा परिणाम आरोग्यावरही होताना दिसतो. चुकीच्या खाण्याच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि वाढतं वजन यामुळे अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो. या समस्येमध्ये लिव्हरमध्ये गरजेपेक्षा जास्त चरबी जमा होते.

सुरुवातीला या आजाराची ठळक लक्षणं दिसत नाहीत. मात्र हळूहळू शरीरात काही बदल जाणवू लागतात. सतत थकवा येणं, पोटाच्या उजव्या बाजूला जडपणा जाणवणं आणि वजन वाढणं अशी लक्षणं दिसू शकतात. पुरुष आणि महिलांमध्ये या आजाराची अनेक लक्षणं सारखी असतात. मात्र, काही लक्षणांमध्ये फरक असू शकतो.

डॉक्टर काय सांगतात?

सी. के. बिर्ला रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे संचालक आणि पोटाच्या आजारांचे तज्ज्ञ डॉ. अनुकल्प प्रकाश यांच्या मते, पुरुषांच्या पोटाभोवती चरबी वाढणं, मधुमेह, रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असणं आणि दारू पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढू शकतो.

Fatty liver warning signs
Cancer symptoms in women: महिलांनो शरीरात ही 5 लक्षणं दिसली तर व्हा सावध; कॅन्सरच्या गाठीची आहेत लक्षणं

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या आजाराचे वेळीच निदान झाल्यास खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करून प्रकृतीत सुधारणा होण्यास मदत मिळू शकते. त्यामुळे शरीरात दिसणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

कोणतंही कारण नसताना सतत थकवा येणं

फॅटी लिव्हरचं एक सामान्य लक्षण म्हणजे सतत थकवा जाणवणं. पुरेशी झोप घेतल्यानंतरही शरीरात उत्साह जाणवत नाही आणि दिवसभर थकल्यासारख वाटू शकतं. अनेक पुरुष कामाचा ताण किंवा वाढत्या वयामुळे असं होत असल्याचं समजून या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे इतर आरोग्यविषयक कारणंही असू शकतात.

पोटात जडपणा जाणवणं

आपले लिव्हर पोटाच्या उजव्या बाजूच्या वरच्या भागात असते. फॅटी लिव्हरचा त्रास वाढल्यास या भागात जडपणा, दाब जाणवणं किंवा सौम्य वेदना होऊ शकतात. काही लोकांना जेवणानंतर पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे पोटात अस्वस्थता जाणवू शकते. मात्र पोटात जडपणा जाणवण्यामागे इतर कारणंही असू शकतात.

शरीराचं वजन वेगाने वाढणं

पोटाभोवतीची चरबी वाढणं हे फॅटी लिव्हरशी संबंधित असू शकते. डॉ. अनुकल्प प्रकाश यांच्या मते, शरीराचं वजन वाढणं आणि इन्सुलिनचा योग्य वापर न होणं यामुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याची शक्यता वाढते. इन्सुलिन हे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे हार्मोन आहे. कोणतंही कारण नसताना वजन सतत वाढत असेल किंवा पोटाची चरबी वाढत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Fatty liver warning signs
Heart Blockage: लिंबू-आल्याचं पाणी प्यायल्याने हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी होते? डॉक्टरांनी सांगितलं सर्जरीशिवाय कसे ठीक कराल ब्लॉकेज?

अशक्तपणा आणि दिवसभर सुस्ती जाणवणं

फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या काही पुरुषांना दिवसभर अशक्तपणा आणि सुस्ती जाणवू शकते. कोणतंही काम करण्याची इच्छा होत नाही किंवा काम करताना लवकर थकवा येतो. यामुळे दैनंदिन कामांवरही परिणाम होऊ शकतो. लिव्हरच्या कामात अडथळा निर्माण झाल्यास अशा तक्रारी जाणवू शकतात.

भूक कमी लागणं

भूक कमी लागणं हेही फॅटी लिव्हरशी संबंधित असू शकतं. काही लोकांना जेवण पाहिल्यानंतर मळमळल्यासारखं वाटतं किंवा खाण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी शरीराला पुरेसं अन्न मिळत नाही आणि अशक्तपणा जाणवू शकतो. भूक न लागण्याचा त्रास सतत होत असेल किंवा त्यासोबत इतर लक्षणंही दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करून घ्यावी.

Fatty liver warning signs
Cancer Symptoms: अचानक वजन कमी होतंय? किती किलो वजन घटणं हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं? डॉक्टरांनी सांगितले महत्त्वाचे संकेत

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com