Kidney Health: आजच '१' पांढरा पदार्थ खाणं बंद करा; किडनी फेलचा धोका वाढतो.. तज्ज्ञ सांगतात...

Salt Awareness: जास्त मीठाचं सेवन किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं. तज्ज्ञांचा इशारा ‘व्हाईट पॉइझन’ म्हणजेच मीठामुळे किडनी फेल्युअरचा धोका वाढतो, आहारात बदल आवश्यक.
white poison salt
salt and kidney health google
Published On
Summary

जास्त मीठाचं सेवन किडनीसाठी धोकादायक ठरू शकतं.

डॉक्टरांचा म्हणतात, मीठ हे ‘व्हाईट पॉइझन’ आहे.

प्रोसेस्ड फूडमध्ये मीठाचं प्रमाण अत्यंत जास्त असतं.

लिंबू, मिरी, लसूण यांसारख्या घटकांनी चव टिकवा येते आणि मीठ कमी करा.

आपल्या जेवणात थोडं जास्त मीठ असलं की खाण्याची चव वाढते. असे अनेकांना वाटते. स्नॅक्सवर शिंपडलेलं मीठ असो किंवा प्रोसेस्ड फूडचा आनंद, मीठ आपल्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग बनलं आहे. पण हेच मीठ हळूहळू आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं, विशेषत: किडनीवर याचा मोठा परिणाम होतो.

चेन्नई येथील एआयएनयू हॉस्पिटलचे वरिष्ठ युरोलॉजिस्ट आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. वेंकट सुब्रमण्यम यांनी 23 ऑक्टोबर रोजी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये इशारा दिला आहे की, जास्त मीठाचं सेवन किडनीसाठी 'व्हाईट पॉइझन' म्हणजेच पांढरं विष ठरू शकतं.

white poison salt
Diabetes Control Drink: रिकाम्या पोटी प्या हे 3 Morning Drinks, काही तासात होईल Blood Sugar कंट्रोल

ते सांगतात की, अनेक लोकांना कल्पनाच नसते की ते रोज किती मीठ खात आहेत. काळानुसार या सवयीमुळे किडनीशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. जसे की किडनी स्टोन, हाय ब्लड प्रेशर आणि अगदी किडनी फेल्युअरचा धोका सुद्धा वाढू शकतो. विशेषतः ज्यांना आधीच किडनी फेल होण्याचा धोका आहे. त्यांनी मीठाच्या प्रमाणाबाबत अधिक खबरदारी घ्यावी.

स्वयंपाकात एक छोटा बदल केल्यानेही मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला चव वाढवण्यासाठी जास्त मीठाची गरज नाही. त्याऐवजी लिंबू, काळी मिरी आणि लसूण यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही पदार्थांचा स्वाद टिकवू शकता आणि मीठाचा वापर कमी करू शकता. तज्ज्ञ सांगतात की, प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूडमध्ये मीठाचे जास्त असते. त्यामुळे फक्त घरच्या जेवणात मीठ कमी घातलं तरी पुरेसं नाही.

white poison salt
Anardana Chutney: कंटाळवाणी हिरवी चटणी विसरा! करून बघा काश्मिरी अनारदाणाची चमचमीत चटणी

बाजारातील पदार्थांचे लेबल वाचा, आणि शक्य तितकं फ्रेश फूड खा. कारण प्रोसेस्ड फूड तुमच्या एकूण सोडियम इनटेकला झपाट्याने वाढवतात. खाण्याच्या सवयींमध्ये थोडी जागरूकता आणि बदल केल्यास तुम्ही तुमच्या किडनीचं चांगलं आरोग्य जास्तवेळ टिकवू शकता. चवीवर तडजोड न करता मीठाचं प्रमाण कमी करणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

white poison salt
Sunday Horoscope: दिवाळीचा फराळ महागात पडणार? 'या' राशींच्या व्यक्तींना आजारांचा सामना करावा लागणार, वाचा रविवारचं राशीभविष्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com