Sakshi Sunil Jadhav
भारतीय जेवण चटणी आणि आचारांशिवाय अपूर्ण मानलं जातं. पण रोजची तीच हिरवी चटणी खाऊन कंटाळा आला असेल, तर आता काहीतरी वेगळं करून बघा.
चवदार, तिखट आणि आंबटपणाचा उत्तम संगम असलेली काश्मिरी अनारदाणा चटणी बनवून तुमच्या थाळीला द्या खास ट्विस्ट. ही चटणी केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर आरोग्यदायी आणि पचायला हलकी
२ टेबलस्पून वाळलेले अनारदाणे घ्या. ही चटणीचा बेस असतो आणि तिला आंबट-गोड चव देतो.
वाळलेले डाळिंब रात्रभर किंवा किमान अर्धा तास पाण्यात भिजत ठेवा. यामुळे ते मऊ होतात आणि बारीक वाटायला सोपे जातात.
अर्धा कप पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन पुसून घ्या. पुदिना चटणीला ताजेपणा आणि सुगंध देतो.
अर्धा लाल कांदा घ्या आणि बारीक चिरा. कांद्यामुळे चव वाढते आणि टेक्स्चर मऊ होते.
२ ते ३ सुक्या काश्मिरी मिरच्या थोड्यावेळ पाण्यात भिजवा. या मिरच्यांमुळे चटणीला सुंदर लाल रंग आणि हलकी तिखट चव मिळते.
भिजवलेले अनारदाणे, चिरलेला कांदा, पुदिना आणि मिरच्या मिक्सरमध्ये घाला.
थोडं पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा. चटणी खूप पातळ किंवा घट्ट न ठेवता मध्यम ठेवा. चवीनुसार मीठ आणि १ टेबलस्पून लिंबाचा रस मिसळा. यामुळे चव बॅलन्स होते आणि चटणी अधिक झणझणीत लागते.