Sakshi Sunil Jadhav
काहीतरी गोड गोष्टींची विशेष आवड आज आपल्याला वाटेल. रहस्यमय कथा, मूव्हि यामध्ये मन रमेल. एक वेगळे काहीतरी वलय घेऊन आज वावराल.
कलासक्त असणारी आपली रास. जोडीदाराबरोबर मनमुरादपणे सुखाची उधळण कराल. महत्त्वाच्या बैठका पार पडतील.
आजोळी प्रेम वाटेल. मामाकडून काहीतरी प्रेयस मिळण्याचे योग आहेत. तब्येतीची काळजी घ्या.
उपासनेने आयुष्याची नवीन दिशा मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. पैशाची निगडित व्यवहार आज करायला हरकत नाही. मन कोमल आणि सुस्त राहील.
घरामध्ये लीडरशिप घेऊन वागावे लागेल. इतरांना सांभाळून घेता घेता पुरे वाट होईल. पण अर्थात या गोष्टी तुमच्या राशीला लिहिल्या झेलता येतात. मोठे व्यवहार होतील.
जवळच्या प्रवासा मधून फायदा दिसतो आहे. भावंड सौख्य उत्तम आहे. वक्ते, प्रकाशक, लेखक यांना दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे.
आपल्या राशीला विशेषत्वाने पैशाचे महत्त्व आहे. आज याच्याशी निगडित आहे महत्त्वाचे व्यवहार होतील. प्रॉपर्टीच्या अनेक गोष्टी आज फायदेशीर ठरतील.
आपल्यावर प्रेम करणे हीच इतरांवर प्रेम करण्याची सुरुवात आहे हे जाणवेल. स्वमग्न राहाल. कदाचित अबोला असणे आज स्वीकाराल.
एखादा निर्णय घ्यायला आपल्या राशीला दोनदा विचार करावा लागतो. कधी महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी मन कचरते. आजही अशीच अवस्था होईल.
जुने परिचय ओळखी यामधून प्रगती दिसून येते आहे. जितके श्रम कराल तितका फायदा आहे. नवनवीन कल्पनांनी व्यापलेला दिवस असेल. धनयोग येतील.
कर्म प्रधानतेचा कारकग्रह शनी आहे. आणि आपली रास शनीचीच आहे. कोणतेही काम चोखपणे करायला आपल्याला आवडते.
देवाची सोबत आपल्याला आवडते. एक वेगळ्या आत्मीयतेने आपण भगवंताचे आराधन करत असता. आज सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर जाल तर भाग्यकारक घटना घडणार आहेत.