Paracetamol safety: गरोदर महिलांसाठी पॅरासिटोमोल किती सुरक्षित? WHO आणि AIIMS च्या डॉक्टरांनी सांगितलं सत्य

Paracetamol safety during pregnancy: गर्भधारणेदरम्यान (Pregnancy) स्त्रियांना ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी यांसारख्या समस्यांसाठी अनेकदा पॅरासिटामॉल (Paracetamol / Acetaminophen) घेण्याचा सल्ला दिला जातो.
Paracetamol safety during pregnancy
Paracetamol safety during pregnancysaam tv
Published On

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. त्यांच्या म्हणण्यानसार, गर्भवती महिलांनी गरोदरपणात टायलिनॉल (पॅरासिटामोल) घेऊ नये, कारण त्यामुळे बाळांमध्ये ऑटिझमचा धोका वाढतो. ट्रम्प यांनी ऑटिझमच्या वाढत्या केसेसमागे या औषधाला जबाबदार धरलं.

ट्रम्प यांच्या या विधानानंतर जगभरातील डॉक्टर्स आणि वैद्यकीय तज्ज्ञ पुढे आले असून त्यांनी स्पष्ट केलंय की, पॅरासिटामोल हे सुरक्षित औषध आहे आणि त्याचा ऑटिझमशी काहीही संबंध नाही. आता या मुद्द्यावर जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांचं उत्तर समोर आलं आहे.

Paracetamol safety during pregnancy
Prostate Cancer Symptoms : शरीरात 'या' समस्या जाणवत असतील तर वेळीच व्हा सावध ! अन्यथा, होऊ शकतो कर्करोग

WHO ने काय सांगितलं?

WHO आणि युरोपियन मेडिसिन एजन्सी (EMA) या दोन्ही संस्थांनी ट्रम्प यांच्या दाव्याला पूर्णपणे फेटाळलं आहे. WHO चं म्हणणं आहे की, आतापर्यंत झालेल्या संशोधनांमध्ये पॅरासिटामोल आणि ऑटिझम यांचा कोणताही थेट संबंध आढळलेला नाही. ज्यांची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध झाली आहे अशा औषधांवर राजकीय विधानांमुळे शंका घेणं योग्य नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

Paracetamol safety during pregnancy
Early detection prostate cancer : गेल्या ४ महिन्यांत ५ पैकी ३ पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचं निदान; पुरुषांनी शरीरातील 'हे' बदल वेळीच ओळखावेत!

EMA च्या म्हणण्यानुसार, पॅरासिटामोल हे गर्भवती महिलांसाठी वेदना आणि ताप कमी करण्यासाठी सुरक्षित औषध आहे. EMA चे चीफ मेडिकल ऑफिसर म्हणाले की, उपलब्ध वैज्ञानिक आकडेवारी तपासल्यानंतर, पॅरासिटामोलमुळे मुलांमध्ये ऑटिझम होतो, असा कुठलाही पुरावा नाही. २०१९ मधील एका रिव्ह्यूमध्येही गर्भावस्थेत या औषधाच्या सेवनाचा आणि मुलांच्या न्यूरोलॉजिकल समस्यांचा काही संबंध नाही, हेच स्पष्ट झालं होतं.

Paracetamol safety during pregnancy
Stomach Cancer: पोटातील कॅन्सरवेळी शरीरात दिसतात 'हे' बदल; लक्षणं ओळखून वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

गरोदरपणाच पॅरासिटोमोल किती सुरक्षित?

AIIMS भोपालच्या जनरल मेडिसिन विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. रजनीश जोशी यांनी सांगितलं की, पॅरासिटोमोल हे ताप आणि वेदना कमी करण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित औषध आहे आणि गर्भवती महिलांनी ते घेऊ शकतात. त्यांच्या मते, जर एखाद्या गर्भवती महिलेला ताप आला तर पॅरासिटामोल शिवाय सुरक्षित असा दुसरा पर्याय आपल्याकडे नाही.

Paracetamol safety during pregnancy
Stomach cancer : सकाळी वॉशरूममध्ये दिसून येतात पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं; शरीरातील बदल ओळखून वेळीच डॉक्टरांची मदत घ्या

डॉ. जोशी यांनी पुढे सांगितलं की, “पॅरासिटामोल आणि ऑटिझम यांचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. जसं लसींमुळे ऑटिझम होतो असं चुकीचं मानलं जातं, तसंच पॅरासिटोमोलबाबतही आहे. वैद्यकीय उपचारांमध्ये सुरक्षितता आणि पुरावे हे सर्वात महत्त्वाचे असतात.

Paracetamol safety during pregnancy
Early signs heart attack face: हार्ट अटॅक येण्यापूर्वी चेहऱ्यामध्ये दिसतात ३ मोठे बदल; लक्षणं दिसताच डॉक्टरांची मदत घ्या

“गर्भावस्थेत औषधं कमीत कमी प्रमाणात दिली जातात आणि तीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिली जातात. त्यामुळे पॅरासिटोमोल प्रत्येक गर्भवतीला आपोआप दिलं जात नाही. पण जर ताप दोन दिवसांपेक्षा जास्त राहिला तर डॉक्टर पॅरासिटामोल देण्याचा सल्ला देतात,” असंही डॉक्टर जोशी म्हणालेत.

Paracetamol safety during pregnancy
Prostate Cancer Early Signs: ही ५ लक्षणं दिसली तर समजा प्रोस्टेट कॅन्सर होणारे; पुरुषांनी त्वरित घ्यावी डॉक्टरांची मदत

WHO आणि EMA चं मत

WHO आणि EMA यांच्या मते, गेल्या अनेक दशकांच्या आकडेवारीनुसार पॅरासिटोमोल वापरणाऱ्या मातांच्या बाळांमध्ये जन्मजात विकृतींचा धोका वाढलेला नाही. काही संशोधनांत ऑटिझम किंवा ADHD यांच्याशी संभाव्य संबंध सुचवला गेला असला, तरी त्याची पुष्टी कुठल्याही वैज्ञानिक पुराव्यांनी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com