Prostate Cancer Symptoms : शरीरात 'या' समस्या जाणवत असतील तर वेळीच व्हा सावध ! अन्यथा, होऊ शकतो कर्करोग

गेल्या काही वर्षांपासून अंग दुःखीच्या आजाराचे पुढे कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. याला प्रोस्टेट कर्करोग म्हटले जाते.
Prostate Cancer Symptoms
Prostate Cancer SymptomsSaam TV

Prostate Cancer Symptoms : कर्करोग हा एक असा आजार आहे ज्यावर मात करून व्यक्तीला परत मिळवणे फार कठीण आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. यात गेल्या काही वर्षांपासून अंग दुःखीच्या आजाराचे पुढे कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. याला प्रोस्टेट कर्करोग म्हटले जाते.

WHO ने दिलेल्या अहवालानुसार, साल 2020 मध्ये तब्बल 10 मिलियन व्यक्ती या आजाराने पीडित होत्या. संपूर्ण जगभरात या आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच सध्या आजारामध्ये प्रोस्टेट कर्करोग हा आजार चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे.

Prostate Cancer Symptoms
Risk of Stomach Cancer : पुरुषांना पोटाच्या कॅन्सरचा धोका अधिक का ? जाणून घ्या कारण

प्रोस्टेट कर्करोग (Cancer) होण्याचे प्रमाण वृध्द व्यक्तींमध्ये जास्त आहे. यामध्ये वय 65 किंवा त्या पुढे असल्यास याची लागण होते. यात बऱ्याच वेळा पुरुषांना याची लागण झाल्याचे समजले आहे. तसेच आनुवंशिक हा आजार (Disease) होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

कर्करोग हा असा आजार आहे यामध्ये रोगाचे निदान लवकर होत नाही. अनेक टेस्ट आणि औषध उपचार केल्यावर देखील आजार बरा होत नाही. बऱ्याच वेळाने याचे निदान होते. मात्र प्रोस्टेट कर्करोगमध्ये लवकर निदान करणे शक्य आहे. यासाठी कोणती लक्षणे (Symptoms) जाणवतात हे माहीत करून घेऊ.

Prostate Cancer Symptoms
Prostate Cancer SymptomsCanva

प्रोस्टेट कॅन्सरवेळी तुमचे हात पाय किंवा कंबर दुखणे अशा समस्या जाणवतात. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करू नये असे काही कर्करोग तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Prostate Cancer Symptoms
Cancer fighting food : 'या' 5 प्रकारच्या भाज्या खा, जीवघेण्या कॅन्सरला दूर पळवा !

कोणत्या समस्या जाणवतात

1. लघवी करताना अडचणी येणे.

2. कमी प्रमाणात लघवी होणे.

3. लघवी करताना रक्त स्त्राव होणे.

4. पुरुषांना स्पर्ममध्ये रक्त येणे.

5. शरीराची हाडे दुखणे.

6. अचानक वजन कमी होणे.

प्रोस्टेट कॅन्सरवर वेळीच इलाज न केल्यास तो फुप्फुस आणि आतड्यांमध्ये देखील पसरू शकतो. या आजारापासून स्वतःला वाचवण्यासाठी तुम्हाला वेळेवर जेवण करणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान न करणे या गोष्टी पाळणे गरजेचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com