Healthy Breakfast : सकाळी पोटभर नाश्ता करावा की हलका? आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगतं? जाणून घ्या योग्य पद्धत

Morning Diet : सकाळच्या घाईगडबडीत बरेच जण नाश्ता करत नाहीत किंवा जे मिळेल ते थोडंसं खाऊन घराबाहेर पडतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे घटक मिळत नाहीत.
Breakfast tips
Breakfast tipsmeta ai
Published On: 

सकाळी उठल्यावर नाश्त्यात नेमकं काय आणि किती खावं, असा प्रश्न अनेकांना पडतो. काही जण दिवसाची सुरुवात पोटभर नाश्ता करून करतात, तर काही जण फक्त चहा -बिस्किट किंवा एखादं फळ खाऊन घराबाहेर पडतात. सकाळी भरपूर खाल्ल्याने दिवसभर ऊर्जा मिळते, असं अनेकांना वाटतं. मात्र, सकाळी पोटभर खाणं खरंच गरजेचं आहे का? की हलका नाश्ता करणं शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे? याबाबत आयुर्वेद आणि विज्ञान काय सांगतं, ते जाणून घेऊया.

आयुर्वेदानुसार सकाळचा नाश्ता कसा असावा?

आयुर्वेदानुसार सकाळी ६ ते १० हा काळ कफ काळ मानला जातो. या काळात पचनशक्ती तुलनेने मंद असल्याचं मानलं जातं. त्यामुळे सकाळी उठल्यावर जड आणि तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हलका, पौष्टिक आणि सहज पचणारा नाश्ता करण्याचा सल्ला दिला जातो. सकाळी भूक नसेल तर जबरदस्तीने पोटभर खाण्याची गरज नाही. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, दलिया, फळं आणि थोडे सुकेमेवे यांचा समावेश करू शकता.

Breakfast tips
Life Certificate 2026 : पेन्शनधारकांनो सावधान! 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम करा, अन्यथा खात्यात पैसे येणार नाहीत

विज्ञानानुसार सकाळी किती खावं?

विज्ञानाच्या दृष्टीनेही सकाळचा नाश्ता संतुलित असणं महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर साधारण ८ ते १० तास शरीराला अन्न मिळत नाही. त्यामुळे सकाळी शरीराला ऊर्जा आणि पोषणाची गरज असते. नाश्त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि हेल्दी फॅट्स असणारे पदार्थ खावेत. यासाठी दूध, दही, मूग डाळीचा पराठा, फळं आणि बदाम यांचा पर्याय निवडू शकता.

सकाळचा नाश्ता करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • सकाळी किती खायचं हे तुमची भूक आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं.

  • व्यायाम किंवा शारीरिक मेहनत जास्त असेल तर जास्त पोषणाची गरज लागते.

  • फक्त चहा-बिस्किट खाण्याऐवजी प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा.

  • उठल्यानंतर लगेच भूक लागत नसेल तर थोड्या वेळाने नाश्ता करू शकता.

  • जबरदस्तीने पोटभर खाणं किंवा सतत उपाशी राहणं टाळा.

  • रोजच्या आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करा.

डिस्क्लेमर: ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.