

देशातल्या पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला दर महिन्याला नियमित पेन्शन हवी असेल, तर लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र वेळेत जमा करणं आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र जमा करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर आहे. त्यामुळे पेन्शनधारकांकडे आता हे काम पूर्ण करण्यासाठी फक्त १५ दिवस शिल्लक आहेत. वेळेत प्रमाणपत्र जमा न केल्याने पेन्शनच्या रकमेत अडथळा येऊ शकतो.
सरकार दरवर्षी पेन्शनधारकांकडून जीवन प्रमाणपत्र मागतं. संबंधित व्यक्ती हयात आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी ही प्रोसेस केली जाते. यामुळे चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पेन्शन जमा होण्याचा धोका टाळता येतो. त्यामुळे प्रत्येक पात्र पेन्शनधारकाने वेळेत जीवन प्रमाणपत्र जमा करणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र जमा केलं नाही तर पेन्शनचे पैसे थांबवले जाऊ शकतात.
पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँकेच्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. यासाठी तीन सोपे पर्याय उपलब्ध आहेत.
स्मार्टफोनच्या मदतीने UMANG ॲपवरील फेस ऑथेंटिकेशन सुविधेचा वापर करून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करता येतं. मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर चेहरा स्कॅन करून ही प्रोसेस पूर्ण करता येते.
स्मार्टफोन वापरताना जर काही अडचण आल्या तर इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) डोअरस्टेप बँकिंग सुविधेचा लाभ तुम्हाला घेता येईल. यासाठी पोस्टमन घरी येऊन डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करायला मदत करेल. तुम्ही इतर माहितीसाठी 033-22029000 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता.
ऑनलाइन प्रक्रिया शक्य नसेल तर जवळच्या बँक शाखेत, संबंधित EPFO कार्यालयात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने जीवन प्रमाणपत्र जमा करता येतं.
शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. आवश्यक कागदपत्रांसह जीवन प्रमाणपत्राची प्रोसेस लवकर पूर्ण करा. वेळेत प्रमाणपत्र जमा केल्याने पेन्शनच्या वितरणात अडथळे येण्याची शक्यता टाळता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.