Kitchen Vastu Tips: किचनमध्ये कचरा किती वेळ ठेवला पाहिजे? तो कधी बाहेर टाकावा? वास्तुशास्त्रात सांगितलेत खास नियम

Kitchen Dustbin: वास्तुशास्त्रानुसार, किचनमधील कचरा जास्त वेळ साठवून ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी कचऱ्याचा डबा रिकामा करावा, असं सांगितलं जातं. तसेच कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा आणि कोणत्या दिशा टाळाव्यात, जाणून घ्या महत्त्वाचे वास्तू नियम.
Kitchen Vastu Tips
Kitchen Vastu Tipssaam tv
Published On: 

घरातील किचन ही अत्यंत महत्त्वाची जागा मानली जाते. याच ठिकाणी संपूर्ण कुटुंबासाठी जेवण तयार केलं जातं. त्यामुळे किचन स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवणं गरजेचं असतं. पण अनेकदा स्वयंपाकघरात तयार होणारा कचरा बराच वेळ कचऱ्याच्या डब्यात तसाच ठेवला जातो. रात्री झोपण्यापूर्वी किचनमधील कचरा बाहेर टाकण्याकडे अनेकांचं दुर्लक्ष होतं.

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये कचरा जास्त वेळ साठवून ठेवणं योग्य मानलं जात नाही. मग किचनमधील कचरा किती वेळ ठेवावा? कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला असावा? जाणून घेऊया याबद्दलची महत्त्वाची माहिती.

Kitchen Vastu Tips
Chanakya Niti: 'या' ५ गोष्टी आजच करा; समाजात मान-सन्मान मिळेल अन् सगळेच करतील आदर

रात्री झोपण्यापूर्वी कचरा बाहेर काढा

वास्तुशास्त्रानुसार, किचनमध्ये कचरा जास्त वेळ साठवून ठेवू नये. रात्री झोपण्यापूर्वी किचनमधील कचरा बाहेर टाकावा, असं सांगितलं जातं. रात्रीच्या वेळी किचनमध्ये कचरा ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, अशी मान्यता आहे. तसंच यामुळे माता अन्नपूर्णा नाराज होते, अशीही मान्यता आहे. त्यामुळे दररोज रात्री झोपण्यापूर्वी किचनमधील कचऱ्याचा डबा रिकामा करणं चांगलं मानलं जातं.

Kitchen Vastu Tips
Kitchen Vastu Tips: किचनमध्ये मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत? वास्तूशास्त्रात सांगण्यात आले आहेत योग्य नियम

कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा?

किचनमध्ये कचऱ्याचा डबा ठेवतानाही काही नियम पाळण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात दिला जातो. वास्तुनुसार, किचनमध्ये कचऱ्याचा डबा ठेवण्यासाठी वायव्य म्हणजेच उत्तर-पश्चिम किंवा नैऋत्य म्हणजेच दक्षिण-पश्चिम दिशा योग्य मानली जाते. त्यामुळे कचऱ्याचा डबा ठेवताना या दिशांचा विचार करावा.

या दोन दिशांना कचऱ्याचा डबा ठेवणं टाळा

वास्तुशास्त्रानुसार, किचनच्या ईशान्य म्हणजेच उत्तर-पूर्व आणि आग्नेय म्हणजेच दक्षिण-पूर्व कोपऱ्यात कचऱ्याचा डबा ठेवू नये. ईशान्य दिशा ही देवाची दिशा मानली जाते. तर आग्नेय दिशेला अग्नीचा वास असतो, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दोन्ही कोपऱ्यांमध्ये कचऱ्याचा डबा ठेवणं टाळावं, असं वास्तुशास्त्र सांगतं.

Kitchen Vastu Tips
Washing Machine Vastu: घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवताय? योग्य दिशा माहिती नाही? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

कचऱ्याचा डबा नेहमी झाकून ठेवा

किचनमध्ये कचऱ्याचा डबा ठेवताना तो नेहमी झाकण असलेला असावा. कचऱ्याचा डबा उघडा ठेवू नये. उघड्या कचऱ्यामुळे नकारात्मकता निर्माण होते, असं वास्तुशास्त्रात मानले जाते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.