Fertility Diet: प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी योग्य आहार कोणता? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून

Infertility Reasons: चुकीची जीवनशैली आणि अस्वास्थ्यकारक आहार यामुळे महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. सध्या प्रजननक्षमतेच्या समस्येमुळे अनेक महिला आणि तरुण त्रस्त आहेत.
How to boost sperm count
How to boost sperm countSaam Tv
Published On

How In Increasing Fertility in Men:

चुकीची जीवनशैली आणि अस्वास्थ्यकारक आहार यामुळे महिला आणि पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम होताना दिसून येत आहे. सध्या प्रजननक्षमतेच्या समस्येमुळे अनेक महिला आणि तरुण त्रस्त आहेत.

याबाबतची माहिती दिली आहे पुण्यातील वंधत्व निवारण तज्ज्ञ, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या डॉ. निशा पानसरे म्हणतात की, यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी शुक्राणू निरोगी असणे हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. यात शुक्राणूंची संख्या, गतिशीलता, रचना आणि एकूणच गुणवत्ता चांगली असणे गरजेचे आहे. संतुलित आहार (Food) हे शुक्राणूंचे आरोग्य (Health) संतुलित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

शुक्राणूंच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक कोणते?

1. अँटिऑक्सिडंट्स:

अँटिऑक्सिडंट्स जसे की जीवनसत्त्व (Vitamins) सी आणि ई, युक्त आहार शुक्राणूंच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. यामध्ये लिंबूवर्गीय फळे, बेरी, सुकावमेवा आणि तेलबियांचा समावेश आहे. तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंट्सचा समावेश करा.

2. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्:

ओमेगा -3 फॅटी ऍसिडयुक्त पदार्थ जसे की मासे, फ्लॅक्ससीड्स(अळशी) आणि अक्रोड. हे शुक्राणूंची रचना सुधारण्यास मदत करतात. एकुणच प्रजनन आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ओमेगा-३ फॅटी ऍसिडस् शुक्राणू पेशींच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ओमेगा ऍसिडचे आहार समावेश केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

How to boost sperm count
Childhood Asthma : सततच्या सर्दी-खोकल्यामुळे पुणेकर त्रस्त, १० पैकी ४ चिमुकल्यांना होतोय बालदमाचा त्रास

3. झिंक

झिंक हे शुक्राणूंच्या उत्पादनासाठी आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोनसाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मांसाहार, तृणधान्य आणि शेंगा यासारखे पदार्थ झिंकचे प्रमुख स्त्रोत आहे.

4. फोलेट:

फॉलिक ऍसिड (ज्याला फोलेट देखील म्हणतात) प्रजनन समस्यांना तोंड देत असलेल्या पुरुषांमध्ये तसेच प्रजननक्षम पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवते. पालेभाज्या, मसूर आणि एवोकॅडो हे फोलेटचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत.

5. व्हिटॅमिन डी:

व्हिटॅमिन डी टेस्टोस्टेरॉनच्या पातळीशी निगडीत आहे आणि त्याची कमतरता शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते. सूर्यप्रकाश,संतुलित आहार आणि मासे हे व्हिटॅमिन डीचे उत्तम स्त्रोत आहेत.

How to boost sperm count
Study Tips: SSC, HSC च्या विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागत नाही; या १० टिप्स फॉलो करा

6. लायकोपीन:

टोमॅटो, टरबूज आणि गुलाबी रंगाच्या द्राक्षांमध्ये आढळणारे लायकोपीन हे शुक्राणूंच्या वाढीस आणि गतिशीलतेस मदत करतात.

शुक्राणूंच्या आरोग्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या

1. हायड्रेशन:

हायड्रेटेड राहणे हे प्रजनन आरोग्यासह संपुर्ण आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. भरपुर पाणी पिणे आणि ताजी रसाळ फळे तसेच पालेभाज्यांचे सेवन करणे हे देखील शरीकी हायड्रेटिंग राखण्यास मदत करतात.

How to boost sperm count
Home Security : घराच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरा लावताय? या गोष्टींची काळजी घ्याच, अन्यथा...

2. प्रथिनयुक्त आहार:

आपल्या आहारात कोंबडी, मासे आणि शेंगा यांसारख्या प्रथिनांचा समावेश करा. जास्त प्रमाणात लाल मांसाचे सेवन केल्याने शुक्राणूंच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

3. प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचे सेवन मर्यादित करा:

प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जास्त साखरेमुळे शरीरात जळजळ निर्माण होऊ शकते आणि शुक्राणूंच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उत्तम प्रजनन आरोग्यासाठी प्रक्रिया न केलेले अन्नपदार्थांची निवड करा.

How to boost sperm count
Hungry Issue : तुम्हालाही सतत भूक लागते? दुर्लक्ष करु नकाच! असू शकतात या ५ गंभीर समस्या

4. वजन नियंत्रित राखा

लठ्ठपणाचा संबंध पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होण्याशी जोडला गेला आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायामाद्वारे वजन नियंत्रित राखा.

प्रजननक्षमतेसाठी अनुकूल आहाराचा अवलंब करणे हे शुक्राणूंच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. पालकत्वासाठी स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यांनी वैयक्तिक आरोग्य आणि प्रजनन समस्या सोडवणे गरजेचे आहे. वेळोवेळी वंधत्व निवारण तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. पौष्टिक आहाराला प्राधान्य देत पुरुष त्यांच्या पुनरुत्पादक क्षमतेच्या वाढीसाठी आणि निरोगी आणि यशस्वी गर्भधारणेच्या दिशेने प्रवास करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com