Home Security : घराच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरा लावताय? या गोष्टींची काळजी घ्याच, अन्यथा...

Camera Safety Tips : घराच्या सुरक्षिततेसाठी आतील आणि बाहेरील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी होम सिक्युरिटी कॅमेरा वापरला जातो. परंतु, तुम्ही देखील घराच्या सिक्युरिटीसाठी तुम्ही देखील कॅमेरा लावत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.
Home Security
Home Security Saam Tv
Published On

Home Security Camera :

घराच्या सुरक्षिततेसाठी आतील आणि बाहेरील भागांवर लक्ष ठेवण्यासाठी होम सिक्युरिटी कॅमेरा वापरला जातो. परंतु, तुम्ही देखील घराच्या सिक्युरिटीसाठी तुम्ही देखील कॅमेरा लावत असाल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल.

तुमची छोटीशी चुक तुम्हाला अतिशय महागात पडू शकते. बरेचदा घराच्या बाहेर किंवा आत लावलेला कॅमेरा आपले पर्सनल माहिती देखील कॅप्चर करत असतो. त्यामुळे आपले मोठे नुकसान होऊ शकते. जर तुमच्या घरात (Home) किंवा घराच्या बाहेर कॅमेरा (Camera) असेल तर या गोष्टींची काळजी (Care) घ्यायाला हवी जाणून घेऊया.

1. कॅमेरा पासवर्ड

तुमच्या कॅमेरा पासवर्ड स्ट्रॉग असणे अधिक महत्त्वाचे आहे. तुम्ही डीफॉल्ट पासवर्ड वापरत असल्यास सेटिंग ताबडतोब बदला. डीफॉल्ट पासवर्ड वापरल्याने तुमची खासगी माहिती लीक होऊ शकते. तसेच एकच पासवर्ड वापरल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Home Security
32 इंचाचा Smart TV खरेदी करा फक्त ५ हजारात, या मॉडेल्सवर मिळतोय बंपर Discount

2. कॅमेरा फर्मवेअर

कॅमेरा वापरण्यासाठी फर्मवेअर महत्त्वाचे आहे. हे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कॅमेऱ्याच्या सुरक्षिततेसाठी सॉफ्टवेअरच्या संदर्भात सुरक्षा अपडेट्सची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कॅमेऱ्यांमध्ये ऑटो अपडेट सेटिंग पर्याय उपलब्ध नसल्यास हे सेटिंग मॅन्युअली अपडेट ठेवा.

3. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन

घरातील लोक कॅमेराचा डेटा वापरत असतील तर सिक्युरिटीची जास्त गरज नको. परंतु, घरातील सुरक्षिततेसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन करा. या सिक्युरिटी फीचरच्या मदतीने कॅमेऱ्याचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी OTP लागेल. डिव्हाइसवर हा OTP मिळेल. यासाठी तुम्ही Google Authenticator वापरू शकता.

Home Security
Jio धन धना धन ! 5G Data आणि Unlimited Calling सह वर्षभर फुकटात पाहाता येईल Disney + Hotstar; युजर्सची होणार मज्जा

4. प्राइवेट स्पेस

घराच्या सुरक्षिततेसाठी कॅमेरा लावत असाल तर बाथरुम, बेडरुम आणि प्रायवेट जागेजवळ इन्स्टॉल करु नका. यामुळे तुमची खासगी क्षण त्याच कॅप्चर होऊ शकतात. ज्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com