Holi 2024: होळीच्या दिवशी अशी 'घ्या' त्वचेची काळजी

Protect Sensitive Skin From Holi Colors : होळीला रंग खेळायला सर्वांना आवडतं. पंरतु होळीच्या रंगाच्या अनेकदा चेहऱ्यावर विपरीत परिमाण होतो. यासाठी काय काळजी घ्यायची ते आपण जाणून घेऊ या.
Protect Sensitive Skin From Holi Colors
Protect Sensitive Skin From Holi Colors Yandex

Holi Colors Side Effects Protection

होळीच्या दिवशी बाजारात मिळणारे रासायनिक रंग अनेकांना सहन होत नाहीत. हे रंग त्वचेला खराब करतात. संवेदनशील त्वचेच्या लोकांच्या समस्या वाढतात. अशा वेळी रंग खेळताना विशेष काळजी घेणे गरजेचे (Protect Sensitive Skin) आहे. अनेकदा रंगांमधील केमिकल्समुळे त्वचेवर पुरळ उठणे, जळजळ होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आपला थोडासा निष्काळजीपणा आपला चेहरा खराब करू शकतो. अशा वेळी विशेष काळजी घेण्याची गरज असते. (latest marathi news)

२५ मार्च रोजी होळी असल्यामुळे आता रंगांची जोरदार उधळण सुरू होणार आहे. त्यामुळे केमिकलमुक्त सुरक्षित होळी खेळण्याचा प्रयत्न करा. यासाठी बाजारातील रंगांऐवजी घरगुती रंगांचा वापर करा. त्यामुळे तुमची त्वचा, केस आणि डोळ्यांना नुकसान होणार नाही. (Holi 2024) आरोग्यालाही हानी पोहोचणार नाही. त्यामुळे संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी रासायनिक रंग टाळण्यासाठी नैसर्गिक रंगांचा जास्तीत जास्त वापर करा.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्वचा हायड्रेट करा

होळी खेळण्याअगोदर तुमची त्वचा हायड्रेट करा. होळीच्या आदल्या रात्री तुमच्या डॉक्टरांनी शिफारस केलेल्या क्रिमने तुमची त्वचा हायड्रेट करा. त्यानंतर सकाळी उठल्यावर चेहऱ्यावरसनस्क्रीन लावायला विसरू (Holi Colors Side Effects) नका. त्याच्या मदतीने तुमची त्वचा अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून तसेच हानिकारक रंगांच्या प्रभावापासून सुरक्षित राहील. त्यामुळे रंग लावण्यापूर्वी त्वचा हायड्रेट करा.

होळीचे रंग खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर पेट्रोलियम जेलीचा जाड थर (Holi Colors) लावा. त्यावर ऑलिव्ह आणि खोबरेल तेल लावा. रंग खेळण्यापूर्वी केसांना नीट तेल लावा. केसांची विशेष काळजी घ्या, जेणेकरून आरोग्याला हानी पोहोचणार नाही.

Protect Sensitive Skin From Holi Colors
Holi Chemical Color 2024 : होळीला खरेदी केलेला रंग केमिकल फ्री आहे का? कसे कळेल?

रंग स्वच्छ कसा करायचा?

जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त रंग लागला असेल, तर तो घासू नका. त्यामुळे पहिल्यांदा चेहार फेसवॉशने स्वच्छ धुवावा. त्यानंतर चांगल्या क्लिंझरने त्वचा स्वच्छ करा. यानंतर बेसन, हळद, तांदळाचे पीठ, गुलाबपाणी आणि थोडे खोबरेल तेल एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे राहू द्या. नंतर हलक्या हाताने मसाज करून चेहरा स्वच्छ (Colors Side Effects Care) करा.

चेहऱ्यावरील रंग काढून झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर (How To Protect Sensitive Skin) लावा. जर तुम्हाला रॅशेसची समस्या येत असेल, तर ताजे कोरफडीचे जेल लावू शकता. होळीनंतर, दोन ते तीन दिवस चेहऱ्यावर कोणतेही रासायनिक मेकअप उत्पादन वापरणे टाळा. फेशियल किंवा ब्लीचसारखे उपचार करू नका.

Protect Sensitive Skin From Holi Colors
Holi Festival : होळी सणाच्या कालावधीत वृक्षतोड केल्यास होणार दंडात्मक कारवाई; BMC ने केलं हे आव्हान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com