Holi Festival : होळी सणाच्या कालावधीत वृक्षतोड केल्यास होणार दंडात्मक कारवाई; BMC ने केलं हे आव्हान

Holi Festival : होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. रविवारी होळी असल्याने नागरिकांना वृक्षतोड न करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कुणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबत पोलीस तक्रार करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.
Holi Festival
Holi FestivalSaam Digital
Published On

Holi Festival

होळीनिमित्त मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. रविवारी होळी असल्याने नागरिकांना वृक्षतोड न करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. कुणीही बेकायदा वृक्षतोड करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यासोबत पोलीस तक्रार करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच होळीच्या कालावधीत वृक्षतोड होत असल्याचे आढळल्यास पालिका अधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन पालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. महापालिकेच्या १९१६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’नुसार कलम २१ अन्वये, वृक्ष प्राधिकरणाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही झाड तोडणे हा अपराध आहे. वृक्षतोडीच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी संबंधित व्यक्तीला एक हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे. एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन परदेशी यांनी केले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Holi Festival
Vasai Fire: वसईत खेळणी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी

वसईत खेळणी बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

वसईतून मोठी बातमी समोर आली आहे. वसईत खेळणी बनविणाऱ्या शैलेश इंडस्ट्रियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आज गुरुवारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. या आगीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. या आगीची मिळताच अग्निशमन दलाचे ५ अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. कंपनीला नेमकी आग कशी लागली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Holi Festival
Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीची चर्चा कुठपर्यंत आली? 'वंचित'बाबत भूमिका काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com