कोमल दामुद्रे
२५ मार्चला देशभरात धुलिवंदनाचा सण साजरा केला जाणार आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेकजण या सणाची आतुरतेने वाट पाहात असतात.
होळीच्या दिवशी प्रत्येकजण रंग खरेदी करतात. होळीचा गुलाल आणि इतर रंग खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे रासायनिक रंग बाजारात विकले जातात. हे रंग तुम्ही केवळ वासावरुन ओळखू शकता.
हर्बल रंगांमध्ये अधिक चमक नसते. परंतु, रासायनिक रंगात अधिक चमक दिसेल.
जर रंग पाण्यात पूर्णपणे विरघळला असेल तर रंग नैसर्गिक आहे. रंग विरघळला नाही तर तो केमिकलयुक्त आहे असा समजावा.
रासायनिक रंग त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे किंवा खाज लागू शकते.
होळीचे हर्बल रंग तयार करण्यासाठी तुम्ही बीटरुट, फुले आणि चंदनाचा वापर करु शकता.