कोमल दामुद्रे
यंदा रंगपंचमीचा सण २५ मार्चला साजरा केला जाणार आहे.
या दिवशी अनेक ठिकाणी भांग बनवली जाते. जर तुम्ही देखील घरच्या घरी भांग बनवायचा विचार करत असाल तर पाहा सोपी रेसिपी
भांगेची गोळी, दूध, साखर, आवडीचा सुका मेवा, संत्र्याचा रस , द्राक्षाचा अर्क
ड्रायफ्रूट्स बारीक वाटून घ्या. एका भांड्यात दूध गरम करुन त्यात साखर घालून उकळवून घ्या.
नंतर त्यात वाटलेले बारीक ड्रायफ्रूट्स घाला. उकळवलेल्या दूधात भांगेची गोळी घाला.
त्यात तुम्ही द्राक्षाचा अर्क किंवा संत्र्याचा अर्क घालू शकता. त्यामुळे त्याला वेगळी चव येईल.