BP Medicine: हाय BP च्या औषधांनी 'ही' गंभीर समस्या होते दुर्लक्षित, वाढतो हार्ट अटॅकचा धोका; तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती

BP Medicine Side Effects: हाय ब्लड प्रेशरची औषधे फक्त आकडे कमी करतात, पण मुळ कारण दुर्लक्षित राहते. त्यामुळे भविष्यात हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, असा तज्ज्ञांचा इशारा.
BP Medicine Side Effects
Hypertension Health Warninggoogle
Published On

हाय ब्लड प्रेशरचा धोका हा आता एक कॉमन समस्या झालीये. चाळिशीतल्या तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकांना BPच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. कारण शरीरात याची लक्षणे खूप आधीच जाणवतात. जी सगळेच दुर्लक्षित करतात. त्यामुळे याचं प्रमाण खूप वाढतं. तेव्हाच लोक डॉक्टरांकडे उपचारासाठी धाव घेतात.

बऱ्याचदा डॉक्टर तुमचा Bp तपासून त्यावर औषधं लिहून देतात. ज्याने तुम्हाला वाढलेले ब्लड प्रेशर कमी करता येईल. पण आता डॉक्टरांनी एक गंभीर सत्य सांगितले आहे. त्यामध्ये त्यांच्या दृष्टिकोनानुसार हाय ब्लड प्रेशर ही एक साधी समस्या नसून तो शरीराकडून मिळणारा एक इशाराच आहे.

BP Medicine Side Effects
Kidney: किडनी खराब होण्याची प्रमुख २ कारणे, तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती; वेळीच व्हा सावध

तज्ज्ञांच्या मते, ब्लड प्रेशर कमी करणारी औषधं तुमच्या मुळ समस्येवर उपचार करत नाहीत, त्याने तुम्हाला भविष्यात हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा मृत्यूचा धोका कमी होत नाही. याची औषधं ही फक्त आकडे कमी करतात पण मुळ कारण संपवत नाहीत. उदा. जर कोणी तुमच्या पायावर दगड मारत असेल तर त्याने त्यावर उपचार करत बसण्यापेक्षा तो दगड मारणाऱ्याला थांबवलं पाहिजे. त्याचप्रमाणे रक्तदाब कमी होण्यासाठी औषधं घेण्यापेक्षा तो कशाने वाढतोय? यावर उपचार केले पाहिजे.

तज्ज्ञ म्हणतात, हाय ब्लड प्रेशर हा शरीराचा एक संदेश आहे की शरीरात काहीतरी बिघाड झालाय. यामागे सततचा ताणतणाव, शरीरातील दाह (Inflammation), रक्तवाहिन्यांमध्ये बिघाड, पोषणतत्त्वांची कमतरता, शरीरातील विषारी घटक ही कारणं असू शकतात. त्यावर फक्त औषध उपचार नाही तर रक्तदाबाचे आकडे कमी करण्यावर भर दिला जातो.

त्याने मूळ समस्या दुर्लक्षित राहते, असा इशाराही त्यांनी दिला. मेयो क्लिनिकनुसार 120/80 mm Hg पेक्षा कमी रक्तदाब सामान्य मानला जातो. 180/120 पेक्षा जास्त रक्तदाब ही गंभीर स्थिती असते त्यामुळे यावर तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज असते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

BP Medicine Side Effects
WhatsApp वापरताय? या 5 सिक्रेट ट्रिक्स आत्ताच घ्या जाणून, मैत्रिणींसोबत चॅटिंगची डबल मज्जा येईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com