

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना खूप समस्यांना सामोरं जावं लागतंय. कामाचा ताण, प्रवासाचा ताण, कुटुंबाते टेन्शन, खर्चाचं टेन्शन यासगळ्या रोजच्या गोष्टींमुळे तुमच्या शरीरावर तुमच्या नकळत गंभीर परिणाम होत असतो. कारण हाय ब्लड प्रेशर किंवा Hypertension सारख्या गंभीर आजाराची लक्षणं ही सुरुवातीला जाणवत नाहीत, कारणं लक्षात येत नाहीत. शेवटी आजार कळल्यावर त्यांच्यावर उपचार करणं कठीण होऊन जातं. त्यामुळे बऱ्याच व्यक्तींना त्यांचा जीव गमवावा लागू शकतो.
तुमचं ब्लड प्रेशर जेव्हा वाढलेलं राहतं, तेव्हा हळूहळू रक्तवाहिन्या आणि तुमच्या हार्टवर गंभीर परिणाम होत असतो. कारण तेव्हा त्याला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. तेव्हा अचानक आपल्याला धाप लागल्यासारखं वाटतं. त्यामुळे ह्रदयाच्या डाव्या व्हेंट्रिकल जाड आणि टणक होऊ लागतात. यावेळी रक्तवाहिन्यांच्या आतील थरालाही नुकसान होतं आणि त्यात फॅट, कोलेस्ट्रॉल साचून रक्तप्रवाह कमी होतो. याने शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही.
हाय ब्लडप्रेशरमुळे सगळ्यात आधी Coronary Artery Diseaseचा धोका वाढतो. या आजारात हार्टला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो आणि त्या अरुंद होतात. त्याने तुम्हाला छातीत दुखणं, श्वास घेण्याचा त्रास, थकवा अशी लक्षणे दिसू लागतात. हा त्रास उपचार केले नाहीत तर दिवसेंदिवस वाढत जाऊ शकतो.
ब्लड प्रेशर वाढल्यामुळे Angina म्हणजेच छातीत होणाऱ्या वेदना वाढतात. जेव्हा ह्रदयाला पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही, तेव्हा छातीत जडपणा किंवा वेदना जाणवतात. काही वेळा ही वेदना अचानक वाढून जीवघेणी सुद्धा ठरू शकतं. याचाच पुढचा टप्पा म्हणजे हार्ट अटॅक. जेव्हा रक्तवाहिन्यांमधला प्लाक फुटल्यावर रक्ताच्या गाठी तयार होतात आणि रक्तप्रवाह पूर्णपणे थांबतो. मग अचानक घाम येतो, मळमळ होते आणि छातीत प्रचंड वेगाने वेदना होतात.
बराचवेळ ब्लड प्रेशरचं प्रमाण वाढलेलंच राहत असेल तर Left Ventricular Hypertrophy हा आजारही होऊ शकतो. यामध्ये ह्रदयांचे कवच किंवा भिंत जाड होते आणि ह्रदयाला योग्य प्रकारे रक्त भरता येत नाही. सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत, पण नंतर चालताना दम लागणे, थकवा आणि सूज येणे अशा समस्या वाढतात. त्यामुळे हाय ब्लड प्रेशरमुळे होणारे हे सर्व आजार टाळण्यासाठी वेळेवर काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम, तणाव नियंत्रण आणि वेळोवेळी रक्तदाब तपासणी केल्यावर ह्रदय निरोगी ठेवता येऊ शकतं.
टीप: वरील माहिती ही सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणताही उपचार किंवा औषधोपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.