Sakshi Sunil Jadhav
भारतात शाकाहारी लोक पनीर एक मुख्य प्रोटीन स्त्रोत म्हणून खातात. यामध्ये अनेक गुणधर्म असतात. शिवाय त्याचा शरीरालाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
पनीरमध्ये हाय प्रोटीन, कॅल्शिअम आणि फॉस्फरस असतं. त्यामुळे हाडे मजबूत होतात, स्नायूंची वाढ होते आणि दिवसभर भरल्यासारखं वाटतं. पण याचे जास्त सेवन केल्याने दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतो.
सगळेच पौष्टीक वाटणारे पदार्थ आपलं शरीर जास्त प्रमाणात शोषून घेत नाही. त्याने भविष्यात मोठ्या गंभीर समस्यांनाही सामोरं जावं लागू शकतं.
तज्ज्ञांच्या मते, रोजच्या रोज पनीर खाल्ल्याने तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो, कोलेस्ट्रॉल वाढतं आणि काहींना किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो.
पोट दुखी ही सामान्य वाटणारी पण वेदना देणारी समस्या आहे. पनीर काहींना पचायला खूप जड जातं. लॅक्टोजची अॅलर्जी असलेल्यांनी कमी प्रमाणातच पनीर खावं.
पनीर शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करू शकतं. पण त्याच्या जास्त खाण्याने आणि त्याला तेलात तूपासोबत खाल्ल्याने तुमच्या शरीरातली ग्लुकोजची पातळी वाढू शकते.
पनीरमध्ये हाय सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं आणि त्यामुळे तुमच्या शरीरातले खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. आणि हार्टच्या रक्तवाहिन्यांनाही धोका निर्माण होऊ शकतो.
पनीर हे फॅट आणि कॅलेरीज युक्त असतं. त्यामुळे याच्या अतिसेवनाने तुमचा फॅट वाढू शकतो. त्यात जे लोक दिवसात जास्त हालचाल करत नाहीत, त्यांना याचा परिणाम लगेचच जाणवतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.