High Blood Pressure: BPची औषधं घेताना ही चूक करू नका; डॉक्टरांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

BP Tablets Timing: ब्लड प्रेशरच्या औषधांची योग्य वेळ कोणती, सकाळी की रात्री? हे जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा. त्याने BP नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
BP Tablets Timing
High Blood Pressuregoogle
Published On

सध्याच्या लाइफस्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसत आहेत. त्यामध्ये खाण्यापिण्याच्या वेळांपासून ते झोपेच्या वेळेपर्यंत सगळ्यात बदल झालेले पाहायला मिळतायेत. पण याचा परिणाम शरीरावर किती गंभीर प्रकारे होतो, याचा कोणी विचारच करत नाही. पण या बेसिक वाटणाऱ्या गोष्टी तुमच्या हेल्दी आयुष्याचा एक महत्वाचा भाग असतात. जर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, तर तुम्हाला हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं.

सध्या एक आजार प्रचंड वाढतोय, तो म्हणजे हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure). ही समस्या म्हणजे हार्ट अटॅकसारखीच. जर याकडे दुर्लक्ष केलं, योग्य वेळेवर औषधं घेतली नाहीत किंवा आहारात योग्य बदल केले नाहीत. तर तुम्हाला तुमचा जीवही गमवावा लागू शकतो.

BP Tablets Timing
Constipation Problems: पोट साफ न होण्यामागे ही आहेत ५ धोकादायक कारणं; वेळीच व्हा सावध अन्यथा...

महत्वाचं म्हणजे अनेकांना डॉक्टरांनी दिलेल्या ठराविक वेळेत औषधं खाण्याची सवय नसते. ते त्यांना वाटेल तेव्हा आणि तसं खातात. पण नुकत्याच झालेल्या संशोधनांनुसार रात्री BPची औषधं घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तरीही औषधं सकाळी की रात्री यापेक्षा ती दररोज एकाच वेळी नियमित घेणं जास्त महत्त्वाचं असल्याचं डॉक्टर सांगतात.

तज्ज्ञांच्या मते, BPची औषधं अशा वेळेशी जोडावीत जी वेळ रोज लक्षात राहते. उदाहरणार्थ नाश्ता किंवा रात्रीचे जेवण. कारण औषधांचा डोस चुकणं हे बऱ्याचदा हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सीचं मोठं कारण ठरू शकतं. तुम्ही सकाळ आणि रात्री अशा दोन वेळा औषधं विभागून सुद्धा औषधं घेऊ शकता.

BP Tablets Timing
Mothers Day Gifts 2026: फ्लोरल साडीपासून स्टायलिश जॅकेटपर्यंत; आईसाठी खास मदर्स डे गिफ्ट्स

जर लघवी वाढवणारी औषधं म्हणजेच डाययुरेटिक्स सकाळी घेणं योग्य मानलं जातं. काही रुग्णांमध्ये रात्री रक्तदाब नैसर्गिकरीत्या कमी होत नाही. अशा परिस्थितीत डॉक्टर रात्री औषधं घेण्याचा सल्ला देतात, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : ही माहिती सामान्य जागरूकतेसाठी असून कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. औषधं, आहार किंवा जीवनशैलीत बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. साम टिव्ही याच्याशी सहमत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com