प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर अशा प्रकारे करा!

पर्यावरण वाचवण्यासाठी प्लास्टिकचा कचरा कमी करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे.
How to reuse plastic bag at home
How to reuse plastic bag at homeब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : पर्यावरण वाचवण्यासाठी प्लास्टिकचा कचरा कमी करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला जात आहे. बाजारात अनेक प्लास्टिक पिशव्या आपल्याला पाहायला मिळतात त्यातली काही पिशव्यांवर प्रक्रिया करुन त्यांचा आपण वापर करु शकतो.

हे देखील पहा-

बाजारातून भाजीपाला (Vegetable), फळे (Fruit) किंवा वस्तू आणताना अनेकदा झीप बँग्ज आपल्या घरात जमा होतात. अशावेळी आपण त्या प्लास्टिकच्या पिशव्या फेकून देतो परंतु, त्या पिशव्या टाकून न देता त्याचा पुनर्वापर आपल्या घरी कसा करता येईल ते पाहूया.

असा करा प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर -

१. स्वयंपाकघरात धान्यापासून ते खाद्यपदार्थांपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवता येईल. आपण बन्स, कुकीज आणि ब्रेड झिप असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सहज ठेवू शकतो. कधी कधी काही खाद्यपदार्थ (Food) हातात जास्त चिकटतात. असे खाद्यपदार्थ बनवताना आपण हातमोजे म्हणून प्लास्टिकची पिशवी घालू शकता.

How to reuse plastic bag at home
पावसाळ्यात फु़टवेअर निवडताना या गोष्टीची काळजी घ्या !

२. भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या झिप असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये वेगळ्या ठेवता येतील. त्यामुळे आपला फ्रीजही व्यवस्थित ठेवण्यास मदत होईल. स्वयंपाकघरात काम करताना अनेकदा निवजलेली भाजी, फळांची साले, रिकामी पॅकेजेस यासारख्या कचरा फेकताना आपण डस्टबिनमध्ये प्लास्टिकची पिशवी ठेवल्यास डस्टबिन स्वच्छ राहण्यास मदत होईल.

३. आपल्याला कुठेही जायचे असेल तेव्हा आपण वस्तू प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून ब्रीफकेसमध्ये ठेवा. शॅम्पू, क्रीम आणि मॉइश्चरायझर यासारख्या गोष्टी प्लास्टिकच्या पिशवीत ठेवता येतील. त्याचप्रमाणे मेकअप आणि अॅक्सेसरीज इतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवता येतात. घाणेरडे कपडे किंवा शूज प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्येही ठेवता येतील.

४. आपल्याला बऱ्याचदा प्रवासात मोशन सिकनेस वाटू लागतो त्यामुळे चक्कर आणि गुदमरल्यामुळे उलट्या होतात अशावेळी आपण प्लास्टिकच्या पिशव्याचा वापर आपण करु शकतो.

अशाप्रकारे प्लास्टिकच्या पिशव्यांचा आपण पुनर्वापर करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com