पावसाळ्यात फु़टवेअर निवडताना या गोष्टीची काळजी घ्या !

पावसाळ्यात फुटवेअर निवडताना या टिप्स फॉलो करा.
Fashion tips, how to choose monsoon footwear
Fashion tips, how to choose monsoon footwearब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : ऋतूमानानुसार आपण अनेक गोष्टींची खरेदी करतो. पावसाळ्यात आपण छत्र्या आणि रेनकोटची खरेदी करताना आपण अगदी पारखून करतो.

हे देखील पहा -

पावसाळ्यात (Monsoon) आपण इतर वस्तूंची व्यवस्थितरित्या खरेदी करतो. मग पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या चप्पला किंवा बूटांची खरेदी करताना आपण इतका निष्काळजीपणा का करतो. पावसाळ्यात आपण वेगवेगळे बूट का निवडू नयेत? पावसाळ्यात आपण चप्पला किंवा बूटांची खरेदी करताना ती योग्यरित्या करावी. पाय सतत ओले राहिल्यामुळे आपल्या पायांना सतत खाज लागते व त्यामुळे आपल्या अनेक इंन्फेक्शनला बळी पडावे लागते. त्यासाठी पावसाळ्यात फुटवेअर निवडताना आपण कोणत्या गोष्टींची काळजी (Care) घ्यायला हवी हे जाणून घेऊया

या गोष्टींची काळजी घ्या.

१. फ्लिप फ्लॉप ही रबर आणि प्लास्टिकपासून बनवलेली असते. पावसाळ्यात आपण याचा वापर करु शकतो. फ्लिप फ्लॉप ही आपल्या चपल्लीत साठलेले पाणी (Water) काढून टाकते आणि आपले पाय लवकर कोरडे करते.

Fashion tips, how to choose monsoon footwear
पावसाळ्यात डिहायड्रेटच्या समस्येपासून सुटका कशी मिळवाल ?

२. पावसाळ्यात ओले आणि सतत शूजमधून पाणी टपकू लागते त्यामुळे आपल्याला वैताग येतो अशावेळी आपण रबरी सोल असलेल्या चपलांची निवड करावी. पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी हिरवळ व पाणी जमते त्यावेळी आपण ह्या शूजचा वापर करु शकतो.

३. सध्या क्रॉक्सचा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आहे. वजनाला हलके असून आपल्याला ते सहज कॅरी करता येते. पावसाळ्यासाठी आपण क्रॉक्सची निवड करु शकतो.

४. पावसात बाहेर जाण्यासाठी आपण रबरी शूजची निवड करु शकतो. जे घालायला सोपे, हलके आणि आपले पाय स्वच्छ ठेवतील. शूज निवडताना ते वॉटरपूफ्र निवडावे.

५. पावसाळ्यात आपण अशा चप्पला किंवा शूज घालावेत जे आपल्या पायात टिकून राहतील. यात आपण स्ट्रॅपी सँडलची निवड करु शकतो.

६. फ्लोटर्समुळे आपण सर्वात जास्त सुरक्षित राहू शकतो. यात आपले पाय घसरत नाही. त्यासाठी आपण पावसाळ्यात आपण याची निवड करु शकतो.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com