Heart Disease Diet : चाळीशीनंतरही होणार नाहीत ह्रदयविकाराच्या समस्या, आहारात करा या ४ पदार्थांचा समावेश; डॉक्टरांनी दिला सल्ला

Diet For Heart Patients: चाळीशीनंतर हृदय निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. ओमेगा-३, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
heart healthy foods
Heart Disease Diet google
Published On

तुम्हाला रोज वरण भात खाऊन कंटाळा येतो, तसाच कंटाळा तुमच्या शरीरालाही येतो. तुम्ही घरामध्ये अनेकांना बोलताना पाहिलचं असेल, की ''जेवण अंगी लागत नाहीये''. आपण जितकं हेल्दी आणि पौष्टीक खातो. त्याने शरीराला फायदा मिळतोच. पण जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नसेल किंवा ते पदार्थ तुम्ही बळजबरी म्हणून खात असाल त्याचा काहीच परिणाम दिसत नाही.

डॉक्टर म्हणतात, काही गंभीर आजार हे तुमच्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होत असतात. त्यामध्ये ह्रदयविकाराच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. कोलेस्टेरॉल, रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे कार्य आणि शरीरातली सूज या सर्व गोष्टी योग्य आहारामुळे नियंत्रित राहू शकतात. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. योग्य आहारामुळे शरीरातली सूज कमी होते, लिपिड प्रोफाइल सुधारते आणि वजन नियंत्रणात राहतं. जे निरोगी हृदयासाठी खूप आवश्यक आहे. पुढील माहितीत हेल्दी फुड्सबद्दल जाणून घेणार आहोत.

heart healthy foods
Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

तुमच्या आहारात पूर्ण धान्यांचा जसं की, ओट्स, क्विनोआ आणि ब्राउन राईस हे सोल्युबल फायबरचे उत्तम स्रोत आहेत. हे फायबर शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करतात. तसेच पचनक्रिया सुधारून रक्तवाहिन्यांचं आरोग्यही चांगलं ठेवतात.

हिरव्या पालेभाज्या जसं की पालक, केलफुलाची भाजी आणि ब्रोकोली या जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध खाव्यात. यामधील व्हिटॅमिन K हे रक्ताच्या गाठी योग्य प्रकारे होण्यासाठी मदत करतं आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता टिकून राहते.

बदाम, अक्रोड, चिया सीड्स आणि फ्लॅक्ससीड्स यांसारखे नट्स आणि बिया हे आरोग्यदायी फॅट्स, प्रोटीन आणि फायबरचे उत्तम स्रोत आहेत. यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राहतं.

ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल्स भरपूर असतात. हे घटक ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून रक्तवाहिन्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

डाळी, बीन्स आणि हरभऱ्यासारख्या कडधान्यांमध्ये प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. हे पदार्थ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तातील साखर स्थिर ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी मदत करतात.

टीप: हा लेख फक्त सामान्य माहिती देण्यासाठी आहे. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

heart healthy foods
Belly Fat Loss: पोटावरची चरबी कमी करायची आहे? रोज सकाळी करा हे सोपे उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com