Fiber Deficiency Causes : फायबरच्या कमतरतेमुळे होऊ शकतो हृदयविकार- ब्रेस्ट कॅन्सर, आहारात'या' पदार्थांचा समावेश करा !

दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी या सर्व गोष्टींचे शरीरात योग्य प्रमाणा असणे अत्यंत आवश्यक आहे.
Fiber Deficiency Causes
Fiber Deficiency CausesSaam Tv
Published On

Fiber Deficiency Causes : निरोगी राहण्यासाठी शरीराला अनेक पोषक आणि खनिजांची आवश्यकता असते. यासाठी दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी या सर्व गोष्टींचे शरीरात योग्य प्रमाणा असणे अत्यंत आवश्यक आहे.

आपल्या शरीरात जितकी जीवनसत्त्वांची आवश्यकता असते तितकीच आवश्यकता फायबरची देखील आवश्यकता असते. फायबरची कमतरता निर्माण झाल्यावर शरीरात बद्धकोष्ठतेपासून कर्करोग (Cancer) होण्याचा धोका असतो. (Latest Marathi News)

फायबरच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे हृदयविकार, मधुमेह, बद्धकोष्ठता, स्तनाचा कर्करोग, कोलोरेक्टल कॅन्सर आदी आजारांचा धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत पुरेशा प्रमाणात फायबर या आजारांचा (Disease) धोका कमी करू शकतो.

न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून फायबर-समृद्ध पदार्थांविषयी माहिती शेअर केली आहे. फायबरयुक्त आहार आतडे, हृदयाचे आरोग्य राखण्यासोबतच शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. एखाद्या व्यक्तीला दररोज 30 ग्रॅम फायबरची आवश्यकता असते.

तज्ञांद्वारे उच्च फायबर असणारे पदार्थ कोणते आहेत?

Fiber Deficiency Causes
Viral Infection : बदलत्या ऋतूमध्ये सर्दी-खोकल्यापासून वाचण्यासाठी स्वंयपाकघरातील 'हे' पदार्थ ठरतील बहुगुणी !

1. नासपती आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत, परंतु फार कमी लोकांना माहित आहे की, नासपतीमध्ये फायबर देखील असते. त्यामुळे दररोजच्या आहारात नासपतीचे सेवन अवश्य करा.

2. पोषणतज्ज्ञांनी नमूद केले आहे की, सब्जाच्या बिया स्मूदी, दही आणि इतर पदार्थांना छान चव देतात. या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, विशेषत: विरघळणारे फायबर, ज्यामध्ये पेक्टिन देखील असतो. तसेच सब्जा बिया हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडच्या वनस्पती-आधारित स्वरूपातील सर्वात चांगल्या स्त्रोतांपैकी एक आहेत.

3. बार्लीमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, विशेषत: बीटा-ग्लुकन, जे कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करते. हे वजन कमी करण्यात आणि पचन सुधारण्यास देखील मदत करू शकते. तुम्ही सूप, सॅलडमध्ये बार्ली घालू शकता किंवा भाताला पर्याय म्हणून वापरू शकता.

Fiber Deficiency Causes
World Mental Health 2022 : आहारात 'हे' पदार्थ नसतील तर, कमजोर होऊ शकते मेंदूचे आरोग्य !

4. तुमच्या आहारात बीटरूटचा समावेश केल्यास शरीरातील फायबरचे प्रमाण वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे. बीटरूटमध्ये फोलेट, लोह, तांबे, मॅगनीज आणि पोटॅशियम इतर खनिजाने समृद्ध आहे.

5. ओट्स हे सर्वांगीण आरोग्याला चालना देणारे अन्न म्हणून ओळखले जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ओट्समध्ये बीटा-ग्लुकन नावाचे विशिष्ट प्रकारचे फायबर भरपूर प्रमाणात असते. हे एक मजबूत विद्रव्य फायबर आहे ज्यामध्ये रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे गुणधर्म आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com