

सध्याच्या कामाच्या वेळेत कितीतरी बदल झालेले पाहायला मिळतायेत. त्यामुळे तुमचं दिवसाचं शेड्युल तुम्हाला बदलावं लागत असेल. तज्ज्ञांच्या मते तुम्ही जर तुमच्या लाइफस्टाइलमध्ये चांगले आणि वेळेवर बदल केले नाहीत तर तुम्हाला हार्ट अटॅक सारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, अनेकांना वाटतं की, हार्ट येण्याआधी फक्त छातीतच वेदना होतात. पण तज्ज्ञांनी याचे सुरुवातीच्या संकेताबद्दल सांगितले आहे.
अनेकांना वाटतं की, छातीत वेदना म्हणजे हार्ट अटॅक. पण यासोबत तुम्हाला थकवा, चालताना धाप लागणे, जबडा किंवा पाठीपर्यंत होणाऱ्या वेदना होतात. तुम्ही यावर वेळीच उपचार केले तर हा धोका कमी होऊ शकतो. पण याचं सगळ्यात पहिलं लक्षण समजून घेणं यासाठी गरजेचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, कमरेच्या वरच्या भागात अचानक काहीतरी बिघडल्यासारखं वाटल्यास, त्याकडे दुर्लक्ष करू नका. या भागात हलक्या वेदना झाल्यातरी त्या गंभीर आजाराचं संकेत असतात. तज्ज्ञांच्या मते, वेळेवर ह्रदयाच्या स्नायूंचे संरक्षण केले पाहिजे. तसेच तुम्हाला बऱ्याच दिवसांपासून अपचन होत असेल तर, आम्लपित्त, थकवा किंवा जास्त ताण आल्यासारखं जाणवत असेल तर सावध व्हा. अनेकांना वाटतं की, ही समस्या आपोआप बरी होईल.
आहारातल्या बदलामुळे किंवा कामामुळे ही समस्या जाणवते. मात्र असं नाही. तुमच्या शरीरातला प्रत्येक भाग हा महत्वाचा असतो. तर छातीत दुखणे, दाब जाणवणे, श्वास घेताना त्रास होणे, मान किंवा पाठीत दुखणे ही गंभीर आणि हार्ट अटॅक येण्यापुर्वीची लक्षणे आहेत.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.