Sakshi Sunil Jadhav
भारतात प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात कोथिंबीर असतेच. पण अजुनही अनेकांना तिचे फायदा माहितच नाहीत.
कोथिंबीरीचे पोटासाठी अनेक फायदे असतात. त्यासोबत इतर गोष्टींसाठी तिचा योग्य प्रकारे आपण वापर करू शकतो.
उन्हाळ्यात शरीर पटकन थकून आणि अशक्तपणा जाणवतो. तुम्ही अशावेळी कोथिंबिरीचा ज्यूस सेवन करू शकता.
कोथिंबिरीमध्ये क्वेरसेटिन आणि केम्फेरॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याने शरीराच्या आत असणारी सूज कमी होते.
कोथिंबिरीतील नैसर्गिक घटक पचन एन्झाइम अॅक्टीव्ह करण्यास मदत करतात. त्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्यासारख्या समस्या कमी होतात.
कोथिंबिरीचा ज्यूस हा नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून तुम्ही सेवन करू शकता. त्याने शरीरातले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
तुम्ही कोथिंबीरीच्या या ज्यूसच्या सेवनाने लिव्हर आणि किडनीचे कार्य चांगल ठेवू शकतो. त्याने शरीर हलकंही वाटतं.
कोथिंबिरीमध्ये व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची इम्युनिटीही मजबूत व्हायला सुरुवात होते.
कोथिंबिरीत व्हिटॅमिन K आणि बीटा-कॅरोटीन असतं. त्याने हाडांच्या मजबुती सहज होते.
तज्ज्ञांच्या मते, कोणतेही घरगुती उपाय किंवा नैसर्गिक पेय मर्यादित प्रमाणातच सेवन करावे. आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.