Heart Attack: हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी आहारातून काढून टाका हे 4 पदार्थ; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Cardiologist Advice: हार्ट अटॅकचा वाढता धोका टाळण्यासाठी आहारात बदल आवश्यक आहे. जास्त मीठ, साखर, फॅटी आणि रिफाइंड पदार्थ टाळा, असा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आहे.
Avoid These 4 Foods Now to Lower Your Heart Attack Risk, Says Cardiologist
Heart Attack Riskgoogle
Published On

सध्या लोक दिवसरात्र मेहनत करुन काम करत आहेत. रोज धकाधकीचा प्रवास करुन खूप थकवा येतो, ताण येतो. फक्त पुरुष नाही तर महिलाही यामध्ये सहभागी आहेत. अशावेळेस कामातून घरी जाऊन पुन्हा जेवण बनवणं त्यांच्यासाठी खूप कंटाळवाणं वाटतं किंवा थकवा असल्यामुळे ते टाळलं जातं. तेव्हा लोक बाहेरचं खाणं पसंत करतात. पण याने तुमच्या हृदयावर गंभीर परिणाम होत असतो.

काहींना ३० ते ४० वयातच हार्टच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांनी लाइफस्टाईलमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जितकं हेल्दी खाता, व्यायाम करता, सतत हालचाल करता, पुरेशी झोप घेता या सामान्य सवयींनी तुमचं हार्ट सुरळीत काम करु शकतं. वसावी हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कृष्णकुमार यांच्या प्रसिद्ध लेखात ही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Avoid These 4 Foods Now to Lower Your Heart Attack Risk, Says Cardiologist
Nashik Romantic Place: १४ फेब्रुवारी करा खास! नाशिकपासून २० किमीवर बायकोसोबत फिरा या नयनरम्य ठिकाणी

त्यांच्या मते आपण आपलं हृदय चांगलं ठेवण्यासाठी दिवसातून किती वेळा प्रयत्न करतो. याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसेच आपण काय खातो याकडेही लक्ष दिलं पाहिजे. सोयीस्कर आणि पटकन मिळणारं अन्न निवडताना आपण त्याच्या गुणवत्तेकडे अजिबात पाहत नाही. पुढे डॉक्टरांनी कोणत्या गोष्टींमुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. याची माहिती दिली आहे. याचा वापर करुन तुम्ही तुमचा जीव वाचवू शकता. जर तुम्ही हे डाएट फॉलो केलं नाही तर भविष्यात तुम्हाला नक्कीच हार्ट अटॅकचा सामना करावा लागेल.

मीठातले पदार्थ

तज्ज्ञांच्या मते जास्त मीठ असलेले पदार्थ हृदयासाठी धोकादायक असतात. प्रोस्टेड फूड, पॅकिंगमधले सूप, लोणचं आणि मीठातले सुकेमेवे यामध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं. त्याने तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं.

फॅटी फुड्स

तळलेले पदार्थ, बेकरीतल्या पदार्थांमध्ये काही प्रकारचे फॅट्स असतात. जे शरीरातले वाईट कोलेस्टेरॉल वाढवू शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

पॉलिश केलेले पदार्थ

पॉलिश केलेले पांढरे शुभ्र तांदूळ, पांढरे ब्रेड आणि शुगर फ्री स्नॅक्स यांसारखे रिफाइंड कार्बोहायड्रेट्स रक्तातली साखरेची पातळी वाढवतात. त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि डायबेटीसचा धोका वाढतो.

साखरेचे पदार्थ

साखर घातलेला चहा-कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स आणि गोड डेअरी पेयांमुळे वजन वाढ आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. या दोन्ही गोष्टी हृदयासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे पाणी, हर्बल टी किंवा साखर न घातलेले नैसर्गिक पेय तुम्ही सेवन करु शकता.

(टीप: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही आरोग्य समस्या असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Avoid These 4 Foods Now to Lower Your Heart Attack Risk, Says Cardiologist
Heart Attack : फक्त छातीत दुखणं, नव्हे तर ही आहेत हार्ट अटॅकची लक्षणं, आताच वाचून घ्या अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com