Winter Diet : हिवाळ्यात कोणत्या पिठाची भाकरी खाणे ठरते फायदेशीर? बाजरी, मका की नाचणी? जाणून घ्या 5 पिठांचे खास फायदे

Best Winter Flours For Health : हिवाळ्यात शरीराला ऊब आणि ऊर्जा देण्यासाठी नेमकं कोणत्या पिठाची भाकरी खाणे सर्वात फायदेशीर ठरते. जे पिठांमध्ये असलेले फायबर आणि आवश्यक पोषक घटक भरपूर असतात, जे पचनक्रिया उत्तम ठेवून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
Best winter flours for weight loss and boosting immunity
Best winter flours for weight loss and boosting immunity saam tv
Published On: 

हिवाळा सुरू झाला की आपल्या आहारातही बदल होऊ लागतात. या दिवसांत गरमागरम भाकरी, त्यावर घरचे तूप आणि सोबत पालेभाजी किंवा ठेचा असेल तर जेवणाची मजाच काही और असते. विशेषतः थंडीच्या दिवसांत बाजरी आणि मका यांची भाकरी खाण्याला अनेकजण पसंती देतात. मात्र, बाजरी, मका, ज्वारी, नाचणी आणि गहू यापैकी नेमके कोणते पीठ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर जाणून घेऊया या पाचही पिठांची वैशिष्ट्ये.

बाजरीचे पीठ

हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याला विशेष पसंती दिली जाते. बाजरीमध्ये फायबर आणि लोहासारखे पोषक घटक आढळतात. बाजरीची भाकरी थोडी जाडसर आणि चवीला खास असते. गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत लोणी, तूप, गूळ किंवा पालेभाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पारंपरिक आहाराची आवड असणाऱ्यांसाठी बाजरी हा चांगला पर्याय ठरू शकतो.

Best winter flours for weight loss and boosting immunity
Home Hacks : वॉशिंगमशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांना वास येतोय? मग या 5 जबरदस्त ट्रीक वापरा

मका पिठाची भाकरी

मक्याची भाकरी म्हटले की सर्वप्रथम आठवतो तो मोहरीचा साग. हिवाळ्यात उत्तर भारतात मका पिठाच्या भाकरीला विशेष महत्त्व असते. मक्याच्या पिठात गव्हाप्रमाणे लवचिकपणा नसतो. त्यामुळे त्याची पोळी लाटणे थोडे कठीण जाते. हाताने थापून ही भाकरी तयार केली जाते. चवीला रुचकर असलेली मक्याची भाकरी साग, लोणी किंवा गुळासोबत खाऊ शकता.

ज्वारीचे पीठ

आरोग्यदायी आहारात ज्वारीचाही समावेश करता येतो. ज्वारीमध्ये फायबर असते आणि ती नैसर्गिकरीत्या ग्लुटेनमुक्त असते. त्यामुळे ग्लुटेन टाळणाऱ्या व्यक्तींसाठी ज्वारी हा एक पर्याय ठरू शकतो. ज्वारीच्या पिठात गव्हाप्रमाणे लवचिकपणा नसल्याने भाकरी तयार करताना थोडे कोमट पाणी वापरणे फायदेशीर ठरते. ज्वारीची भाकरी भाजी, आमटी किंवा ठेच्यासोबत छान लागते.

Best winter flours for weight loss and boosting immunity
Indian Railways : लाल-निळा अन् पिवळा; रंग बघून ओळखा ट्रेनचा कोणता डबा आहे?

नाचणीचे पीठ

नाचणी म्हणजेच रागी हे पोषक घटकांनी समृद्ध असलेले धान्य आहे. यामध्ये कॅल्शियम, लोह आणि फायबर आढळते. त्यामुळे रोजच्या आहारात नाचणीचा समावेश करता येतो. नाचणीच्या पिठात ग्लुटेन नसल्यामुळे त्याची भाकरी तयार करताना थोडी काळजी घ्यावी लागते. पीठ मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर केल्यास भाकरी तयार करणे सोपे जाते. नाचणीची भाकरी दही, भाजी किंवा पालेभाजीसोबत खाऊ शकता.

गव्हाचे पीठ

भारतीय घरांमध्ये गव्हाच्या पिठाचा वापर सर्वाधिक केला जातो. गव्हाच्या पिठात ग्लुटेन असल्यामुळे त्याचे पीठ चांगले मळले जाते आणि त्यापासून मऊ, लुसलुशीत पोळ्या तयार होतात. फुलके, चपाती आणि पराठे बनवण्यासाठी गव्हाचे पीठ सोयीस्कर ठरते. रोजच्या जेवणात मऊ पोळ्या खायला आवडत असतील तर गव्हाचे पीठ हा उत्तम पर्याय आहे.

हिवाळ्यात नेमके कोणते पीठ खावे?

हिवाळ्यात या पाचही पिठांपैकी एकच पीठ सर्वांसाठी सर्वोत्तम आहे, असे म्हणता येणार नाही. प्रत्येक पिठाचे स्वतःचे वेगळे पोषणमूल्य आणि वैशिष्ट्य आहे. पारंपरिक चवीसाठी बाजरीची भाकरी, सागासोबत मक्याची भाकरी, तर ग्लुटेनमुक्त पर्याय म्हणून ज्वारी आणि नाचणीचा विचार करता येतो. रोजच्या वापरासाठी गव्हाचे पीठही चांगला पर्याय आहे.

तुम्ही गव्हाच्या पिठात थोडे बाजरी, ज्वारी किंवा नाचणीचे पीठ मिसळूनही पोळ्या तयार करू शकता. यामुळे आहारात वेगवेगळ्या धान्यांचा समावेश करता येईल. त्यामुळे हिवाळ्यात आपल्या आवडीनुसार आणि आहाराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या धान्यांचा आहारात समावेश करा.

टीप: कोणतेही एक पीठ सर्वांसाठी सर्वोत्तम असेलच असे नाही. वैयक्तिक आरोग्याच्या गरजेनुसार आहाराची निवड करावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.