Home Hacks : वॉशिंगमशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांना वास येतोय? मग या 5 जबरदस्त ट्रीक वापरा

how to remove bad smell from clothes washed in washing machine : वॉशिंगमशीनमध्ये धुतलेल्या कपड्यांतून दुर्गंध येणे ही एक समस्या आहे. जी सहसा मशिनमध्ये साचलेली ओल, मळ आणि बुरशीमुळे होते. खालील उपायांनी हा त्रास सहज दूर होऊ शकतो.
how to remove bad smell from clothes washed in washing machine
how to remove bad smell from clothes washed in washing machinesaam tv
Published On: 

घरामध्ये वॉशिंग मशीन असल्यामुळे कपडे धुण्याचे काम खूप सोपे होते. मशीन फुली ऑटोमॅटिक असेल तर काम आणखीनच सोपे वाटते. फक्त कपडे मशीनमध्ये टाका, डिटर्जंट घाला, बटण दाबा आणि काही वेळात स्वच्छ कपडे मिळतात. पण बऱ्याचदा एवढी मेहनत करूनही समस्या सुटत नाही. मशीनमधून कपडे बाहेर काढताच त्यातून कुबट किंवा अजीब दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी स्वच्छ धुतलेल्या कपड्यांमधून दुर्गंधी का येत आहे, हे समजत नाही.

जर तुमच्या बाबतीतही असे घडत असेल, तर याचा अर्थ कपडे व्यवस्थित साफ झाले नाहीत असे नाही. बऱ्याचदा यामागे वॉशिंग मशीनच्या आत जमा झालेली घाण, गरजेपेक्षा जास्त डिटर्जंट किंवा कपडे बऱ्याच वेळ मशीनमध्येच सोडून देणे हे कारण असू शकते. काही लहान सवयी बदलून ही समस्या टाळता येऊ शकते. धुतल्यानंतरही कपड्यांमधून दुर्गंधी येण्याची ही ५ कारणे आणि ती कशी सुधारता येतील ते पाहूया.

how to remove bad smell from clothes washed in washing machine
Indian Railways : लाल-निळा अन् पिवळा; रंग बघून ओळखा ट्रेनचा कोणता डबा आहे?

जास्त डिटर्जंट टाकू नका

अनेकांना असे वाटते की जास्त डिटर्जंट टाकल्याने कपडे चांगले साफ होतात आणि त्यांना सुवासही येतो. पण गरजेपेक्षा जास्त डिटर्जंट कपड्यांच्या धाग्यांमध्ये अडकू शकतो. विशेषतः थंड पाण्यात किंवा कमी वेळेच्या वॉश सायकलमध्ये त्याचे कण पूर्णपणे बाहेर निघत नाहीत. हळूहळू यामुळेच कपड्यांमध्ये दुर्गंधी निर्माण होऊ शकते. मशीनची क्षमता आणि कपड्यांच्या संख्येनुसारच डिटर्जंट टाका. तसेच महिन्यातून एकदा मशीनच्या सूचनेनुसार रिकाम्या ड्रममध्ये क्लीनिंग सायकल चालवा, जेणेकरून आत साचलेली घाण आणि डिटर्जंटचे कण साफ होऊ शकतील.

how to remove bad smell from clothes washed in washing machine
Indian Railways : ट्रेनला उशिरा आहे, प्लॅटफॉर्मवर बसून झोप येतेय? महागड्या हॉटेलवर जाण्यापेक्षा रेल्वेची ही सुविधा येईल तुमच्या कामी

मशीनचा दरवाजा लगेच बंद करू नका

कपडे धुतल्यानंतर मशीनच्या ड्रम, रबर आणि डिटर्जंट ट्रेमध्ये ओलावा राहतो. जर दरवाजा लगेच बंद केला, तर हा ओलावा बाहेर निघू शकत नाही. यामुळे मशीनच्या आत कुबटपणा आणि कपडे बुरशी वाढू शकते ज्याचा वास कपड्यांपर्यंतही पोहोचतो. हे टाळण्यासाठी कपडे बाहेर काढल्यानंतर मशीनचा दरवाजा काही वेळ उघडा ठेवा. फ्रंट लोड मशीनचे रबर कोरड्या कापडाने पुसून घ्या आणि डिटर्जंट ट्रे देखील वेळोवेळी साफ करत राहा.

मशीनमध्ये धुतलेले कपडे तासनतास तसेच ठेवणे टाळा

अनेकजण कपडे धुतल्यानंतरही ओले कपडे तासनतास मशीनमध्येच सोडून देतात. बंद मशीनमध्ये हवा मिळत नसल्यामुळे कपड्यांमध्ये ओलावा टिकून राहतो आणि त्यांना खटटट किंवा कुबट वास येऊ लागतो. कपडे धुतल्यानंतर कपडे बाहेर काढून वाळवण्यासाठी टाका. जर कपडे खूप वेळ मशीनमध्ये पडून राहिल्यामुळे दुर्गंधीयुक्त झाले असतील, तर ते पुन्हा धुवून चांगले वाळवून घ्या.

मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे भरू नका

एकदम जास्त कपडे धुण्याच्या नादात अनेक जण मशीन पूर्णपणे भरून टाकतात. यामुळे कपड्यांना फिरण्यासाठी पुरेशी जागा मिळत नाही आणि पाणी व डिटर्जंट प्रत्येक भागापर्यंत नीट पोहोचत नाही. परिणामी कपड्यांमध्ये घाण आणि डिटर्जंटचे कण तसेच राहतात. मशीनच्या क्षमतेनुसारच कपडे टाका. ड्रममध्ये थोडी रिकामी जागा ठेवा, जेणेकरून कपडे सहजपणे फिरू शकतील. गरज भासल्यास एक्स्ट्रा रिन्स सायकल देखील चालवू शकता.

कपडे पूर्णपणे सुकल्यानंतरच कपाटात ठेवा

बऱ्याचदा कपडे धुवूनही त्यांना दुर्गंधी येण्याचे कारण ते पूर्णपणे न सुकणे हे असते. विशेषतः दमट किंवा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपड्यांमध्ये ओलावा राहतो. जर अशा कपड्यांना थेट कपाटात ठेवले, तर त्यांना कुबट वास येऊ लागतो. कपडे पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच घडी करून ठेवा. घरामध्ये कपडे वाळवत असाल, तर खोलीमध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था करा आणि पंखा चालू ठेवा. कपडे थोडे पसरवून टांगा, जेणेकरून ते लवकर सुकतील. ड्रायर वापरत असाल, तर त्याचा लिंट फिल्टर देखील वारंवार साफ करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.