Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग आजपासून 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका

Helath Tips : वजन वाढल्याने आपल्याला विविध आजारांचा सुद्धा सामना करावा लागतो. आता तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर आहारातून हे पदार्थ पूर्णत: वगळणे उत्तम राहिल.
Helath Tips
Weight Loss TipsSaam TV

सध्याची जीवनशैली इतकी बदलली आहे की प्रत्येक व्यक्तीच्या आहारात फास्टफूडचा समावेश झाला आहे. फास्टफूड खाल्ल्याने याचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होतो. वजन झपाट्याने वाढतं. मात्र ते पुन्हा कमी करण्यासाठी बराच वेळ लागतो शिवाय मेहनतही फार लागते.

Helath Tips
Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात. मात्र वजन अगदी ७० ते ८० किलोच्या आसपास जातं तेव्हा ते कमी करणं फार मोठं आव्हान असतं. वजन वाढल्याने आपल्याला विविध आजारांचा सुद्धा सामना करावा लागतो. आता तुम्हाला देखील वजन कमी करायचं असेल तर आहारातून हे पदार्थ पूर्णत: वगळणे उत्तम राहिल.

भात

भात आपल्या आरोग्यासाठी फार चांगला नाही. भात खाल्ल्याने आपल्या शरीराला हवे तसे प्रोटीन मिळत नाहीत. यामध्ये गलयसेमिक इंडेक्स जास्तप्रमाणात आहे. त्यामुळे वजन कमी होत नाही. उलट वजन आणखी जास्त वाढते. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर आहारातून भात वगळा. भात खाल्ला तरी तो सकाळी खा. रात्री झोपण्याआधी भात खाऊ नका.

साखर

साखर देखील आपल्या आरोग्यासाठी हाणिकारक आहे. साखरेमध्ये जास्तप्रमाणात फायबर असते. त्यामुळे साखर खाल्ल्याने आपलं वजन आणखी वाढतं. तुम्ही वजन कमी करण्यासाठी डायेट सुरू केलं असेल तर चहा, गुळ यांचा समावेश असलेले पदार्थ, मिठाई खाऊ नका. त्यातील कार्बोहायड्रेटमुळे वजन कमी होत नाही.

तळलेले तेलकट पदार्थ

वजन जास्त प्रमाणात आहारातील तेलामुळे वाढते. भाजीमध्ये तेल जास्त असेल तर ती भाजी एकदम टेस्टी आणि चमचमीत लागते. त्याने जिभेची चव पूर्ण होते. मात्र आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही आहारात तळलेल्या पदार्थांचं सेवन करू नका.

जंक फूड

वजन कमी करताना बाहेरील जंक फूड पूर्णत: बंद करा. मग यामध्ये तळलेले फेवर्स, चिप्स, कुरकुरे आणि पिझ्झा, बर्गर हे सर्वच पदार्थ आले. याचे सेवन करू नका. त्याने आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो आणि शरीरातील फॅट जास्तप्रमाणात वाढत जातं.

टीप : ही फक्त सामान्य बातमी आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Helath Tips
Vidya Balan Weight loss : विद्या बालनचं वजन घटवणाऱ्या डाएटमध्ये आहे तरी काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com