आजकाल मुलांच्या हातात पुस्तकं दिसणार नाही, मात्र मोबाईल दिसेल हे नक्की. अनेकवेळा त्यांच्या हातामधून मोबाईल हिसकावून घेतल्यास मुले जोरजोरात रडू लागतात. आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो, ही लहान मुलं मोबाईलमध्ये नेमकं करतात तरी काय. तर ही लहान मुलं ऑनलाइन गेम खेळण्यात गुंग झालेले असतात. या ऑनलाइन गेम खेळण्याच्या व्यसनामुळे मुलं त्यांचा अभ्यास, खाणे, झोपणे, उठणे यासर्व गोष्टी करण्यामध्ये आळसपणा दाखवतात. ऑनलाइन गेम्स खेळल्यामुळे त्यांचा अनेक वेळ वाया जातो आणि दिवसभराचे त्यांचे वेळापत्रक बिघडते.
कोणत्याही वस्तूच्या अति वापर केल्यास ती गोष्ट आपल्यासाठी गोष्ट घातक ठरते. त्याचप्रमाणे मुलांमध्ये ऑनलाइन गेम्स खेळण्याचे प्रमाण वाढले आहे. या सवयीमुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. अनेकदा, जेव्हा पालक आपल्या मुलांना ऑनलाइन गेम्स खेळल्यामुळे ओरडतात तेव्हा ते अधिक हट्टी होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या मुलांसोबत बसून त्यांच्याशी संभाषण करा आणि त्यांच्या मनात नेमकं काय चालू आहे हे जाणून घेण्याचे प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांशी मित्राप्रमाणे वागायला सुरुवात कराल त्यावेळी ते तुमच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवतील.
तुम्ही तुमच्या मुलांना सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला घेऊन जात जा ज्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क वाढेल. त्यानंतर हळूहळू मोबाईलचा वापर कमी होईल. त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्या, ज्यामुळे तुमच्या मुलांची शारीरीक आणि मानसिक दोन्हीरित्या वाढ होईल. मोबाईलच्या अती वापरामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. सारखं गेम्स खेळल्यामुळे डोळ्यांमधील नेत्रजल कमी होते. त्यासोबतच लहान वयात चष्मा लागतो. सतत गेम्स खेळल्यामुळे मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
ऑनलाइन गेमकडे मुलं ओढली जाण्याचे कारण काय?
जेव्हा तुम्ही मुलांना वेळ देत नाही किंवा तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संभाषण होत नाही, तेव्हा विरंगुळा म्हणून मुलं मोबाईल घेतात. ऑनलाइन गेम खेळताना त्यामध्ये खूप वेगवेगळे सेक्शन असतात ज्याची उत्सुकता लहान मुलांच्या मनात निर्माण होते. यामुळे लहान मुलं गेम्सकडे ओढली जातात. या गेम्समधील आकर्षक रंग, संगीत आणि मुलांना मिळणाऱ्या टास्कमुळे मुलं गेमकडे आकर्षित होतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.