Dombivli: 62 हजार पुस्तकं रचून उभारलं भव्य राम मंदिर; तुम्ही पाहिलं का?

Dombivli Ram Mandir: मंदिर संपूर्ण उभं करायला 30 दिवस लागले असून मंदिर 50 फूट उंच 80 फूट रुंद 40 फूट लांब आहे. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले.
Dombivli
DombivliSaam TV
Published On

अभिजित देशमुख

Dombivli News:

येत्या २२ जानेवारीला रामलल्ला मुर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईकर देखील सज्ज झालेत. डोंबिवलीत ६२ हजार पुस्तके रचून भव्य राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

Dombivli
Dombivali Crime: सराईत दोन साखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात लायब्ररी, डोंबिवली एक सांस्कृतिक परिवार, डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 62 हजार 500 पुस्तके रचत राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे.

मंदिर संपूर्ण उभं करायला 30 दिवस लागले असून मंदिर 50 फूट उंच 80 फूट रुंद 40 फूट लांब आहे. आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या मंदिराचे कलश पूजन करण्यात आले. 19 तारखेला या प्रतिकृतीचे काम पूर्ण होणार असून नागरिकांना पाहण्यासाठी खुले होणार आहे.

या क्रीडा संकुलाच्या आवारात 19 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान पै लायब्ररीच्या माध्यमातून बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. विज्ञान आणि वैज्ञानिक यावर आधारित हे प्रदर्शनात असून या कार्यक्रमादरम्यान विविध मान्यवरांचे विविध विषयांवर मार्गदर्शन देखील रसिकांना लाभणार आहे.

Dombivli
Pune Crime: पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या अभिनेत्रीसह २ रशियन मॉडेल ताब्यात, परदेशातील कनेक्शन उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com