[Watch] Vitthala Tuch Movie Trailer: माणसा माणसांत दडलेला विठ्ठल 'विठ्ठला तूच' मधून येणार भेटीला, ट्रेलरने वाढविली उत्सुकता
मराठी सिनेरसिकांसाठी हे वर्ष खूपच खास ठरत आहे. २०२४ च्या सुरुवातीपासून मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक चांगल्या धाटणीचे आणि कंटेट असलेले चित्रपट भेटीला येत आहेत. काही चित्रपटांची घोषणा झाली आहे तर काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 'विठ्ठला तूच' चित्रपटाची घोषणा करण्यात आली. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. विठुरायाला साकड घालणारा आणि विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी सुरू असलेली धडपड या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
खरा विठ्ठल तोच असतो जो संकटावेळी मदतीला धावून येत, आपली मदत करतो, आपले रक्षण करतो. मात्र चित्रपटातील या अशाच विठ्ठलाची कथा म्हणजेच विठ्ठल शिंदेची कथा मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरणार आहे. या ट्रेलरमधील संवादांनी सर्वांचेच लक्ष वेधले.
एका गावात विठ्ठल शिंदे नावाची महती कितपत आहे आणि हा विठ्ठल शिंदे काय करू शकतो, तो खरा विठ्ठल नेमका कसा झाला, या विठ्ठलाकडे सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तर कशी आहेत, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.
मात्र या विठ्ठलाने त्याच्या आयुष्यात आलेल्या संकटांना बाजूला सारत समाजसेवा करत नेहमीच गोरगरिबांच्या विचारांना आधी प्राधान्य दिले. प्रेमात पडलेल्या या तरुणाचा जेव्हा प्रेमभंग होतो तेव्हा तो कसा सावरतो याची देखील झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. खरा विठ्ठल शिंदे हा कोण आहे?, हे लवकरच तुम्हाला म्हणजे येत्या ३ मे पासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
'वाय जे प्रॉडक्शन' निर्मित आणि प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' या चित्रपटात अभिनेता योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बीबे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या कथेची जोड असलेला हा चित्रपट एका वेगळ्या ढंगात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माणसा माणसांमध्ये दडलेल्या विठ्ठलाचे दर्शन कशाप्रकारे घडू शकत, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. येत्या ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.