Health News: लहान मुलांचे केस पांढरे होतायत? आहारात करा या गोष्टींचा समावेश

Health: लहान मुलांमध्ये आजकाल केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.
Health News
Health NewsSaam Tv
Published On

Health Tips:

पांढरे होणे, टक्कल पडणे अशा समस्या होतात. महिला आणि पुरुष दोघांनाही केसगळती आणि केस पांढरे होण्याच्या समस्या वाढत आहेत. लहान मुलांमध्येही आजकाल केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

शरीराला आवश्यक पोषण न मिळाल्याने लहान मुलांमध्ये केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, जंक फूड असे सर्व पदार्थ खालल्याने शरीराला पुरेसे घटक मिळत नाही. यामुळे डोळ्यांचे आजार, डायबिटीज, लठ्ठपणा, केस पांढरे होणे अशा समस्या होतात. तुमच्याही लहान मुलांचे केस पांढरे होत असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. रोजच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा आणि केस पांढरे होण्यापासून संरक्षण करा.

आवळा

आवळ्यात विटामिन सी आणि अँटी ऑक्सिडंटचे प्रमाण जास्त असते. यामुळे केसांशी निगडीत अनेक समस्या दूर होतात. आवळा चवीला जरी कडू असला तरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही आवळा जाम, कँडी किंवा लोणचंदेखील खाऊ शकतात.

काळे तीळ

काळे तीळ शरीरासाठी फायदेशीर असते. काळे तीळ मेलेनिनचे प्रमाण वाढवते. काळे तीळ खालल्याने त्वचेचा आणि केसांचा रंग चांगला राहतो. तुम्ही काळ्या तीळाचे लाडू, पावडर खाऊ शकतात. तसेच भाकरी किंवा भाजीमध्येही काळे तीळ खाऊ शकतात.

Health News
Gold Silver Rate Today (18th November): सोन्याच्या दरात घसरण, चांदीची चकाकीही उतरली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

काळे मनुके

मनुकात खूप जास्त प्रमाणात लोह असते. त्यात विटामीन सीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केसांना फायदा होतो. केस पांढरे होण्याची समस्या आणि केस गळतीची समस्या यामुळे दूर होते.

कढीपत्ता

कढीपत्त्यात खूप जास्त जीवनसत्तवे असतात. यात लोह आणि कॅल्शियमदेखील असते. त्यामुळे केस गळतीची समस्या कमी होते.

तूप

तूप खालल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तूप त्वचा आणि केसांसाठी चांगले असतात. तूप खालल्याने त्वचा तजेलदार राहते आणि केसदेखील दाट होतात.

Health News
युजर्ससाठी ऑफर्सचा पाऊस! Jio, Airtel आणि Vi देतेय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा फ्री; किमत पाहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com