

स्वयंपाकघरात जेवण बनवताना आपण अनेक वस्तूंचा वापर करतो. यात फोडणीचा तडका देताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कढीपत्ता. कढीपत्त्याच्या फोडणीने पदार्थाची चव वाढते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही कढीपत्ता फायदेशीर असतो. कढीपत्ता वजन कमी करण्यास मदत करतो.
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना वजन वाढीचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही जर वजन कमी करायचे असेल तर जेवणात कढीपत्त्याचा समावेश करा. रोजच्या वापरात कढीपत्त्याचा वापर केल्यास शरीरातील चरबी आणि वजन कमी होते. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी कढीपत्ता कसा उपयोगी आहे हे सांगणार आहोत.
1. पचनक्रिया सुधारणे
वजन कमी करण्यासाठी पचनक्रिया चांगली असणे महत्त्वाचे आहे. कढीपत्ता तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पचनक्रिया सुधारुन वजन कमी होण्यास मदत होते. कढीपत्ता शरीरातील आम्ल कमी करुन पचनक्रिया होण्यास मदत करते. गॅस, ब्लोटिंग अशा समस्येवरदेखील कढीपत्ता प्रभावी काम करते.
2. साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते
वजन कमी करण्यासाठी रक्तदाब आणि साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे महत्त्वाचे आहे. रक्तातील पातळी स्थिर ठेवण्यासाठी कढीपत्ता उपयोगी ठरतो. कढीपत्त्यात असलेले कंपाउंड इन्सुलिन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
3. मेटाबॉलिज्म वाढवणे
कढी पत्त्यात अँटीऑक्सिडंट आणि बायोअॅक्टिव कपाउंड्स असतात. त्यामुळे मेटॅबॉलिज्म मोठ्या प्रमाणात तयार होते. शरीर कॅलरी बर्न करते. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.
4. ताण कमी करते
बदलत्या जीवनशैलीत शरीरावर आणि मनावर ताण येणे अगदी सहाजिक आहे. हेही कधीकधी वजन वाढण्याचे कारण असू शकते. या परिस्थितीत कढीपत्ता खूप उपयुक्त ठरतो.
5. कमी कॅलरी आणि पोषक तत्वे
कढी पत्त्यात कमी कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच कढीपत्त्यात मोठ्या प्रमाणात विटामिन ए,बी ,सी आणि आवश्यक तत्त्वे असतात. त्याचसोबत कॅल्शियम आणि आयन सारखी पोषक तत्वे असतात.
6. भूक कंट्रोल
कढी पत्त्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते. त्यामुळे भूक नियंत्रणात राहते. फायबरमुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे जाणवते त्यामुळे सतत भूक लागत नाही. जेवणात कढीपत्त्याचा समावेश केल्यास भूक कमी लागण्यास आणि कॅलरी कमी होण्यास मदत होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.