Raw Turmeric Benefits: कच्च्या हळदीचे गुणकारी फायदे; अनेक आजार होतील चुटकीसरशी दूर

Raw Turmeric : हळदीत अनेक रोगप्रतिकारक गुणधर्म आहे.
Raw Turmeric Benefits
Raw Turmeric BenefitsSaam Tv
Published On

Raw Turmeric Helpful For Skin And Body :

स्वयंपाकघरात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. हळद ही जवळपास सर्व भाज्यांमध्ये वापरली जाते. हळद ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते. हळद ही ना फक्त जेवणासाठी तर आरोग्यासाठीही फायदेशीर असते. हळदीने अनेक आजारांवर नियंत्रण मिळवू शकता. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हळद ही वापरली जाते.

हळदीत अनेक रोगप्रतिकारक गुणधर्म आहे. अनेक आजारांचा प्रतिकार करण्याची क्षमता हळदीत असते. हळदीमुळे सांधिवात आणि हृदयविकाराचा धोका नियंत्रित राहतो. हळद आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला हळदीचे फायदे सांगणार आहोत.

Raw Turmeric Benefits
Government Loan Scheme: खिशात १ रुपया नाही, पण बिझनेस सुरु करायचाय? जाणून घ्या लोन देणाऱ्या खास योजना

1. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध

कच्च्या हळदीमध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. ही हळद आधी बारीक करुन घ्या, नंतर गरम पाण्यात मिसळा आणि मध घाला. हे पाणी तुम्ही नियमितपणे पिल्यास तुमच्या शरीरातील वाईट पदार्थांचा नाश होईल.

2. पचनक्रिया चांगली होते

कच्ची हळद ही पचनक्रियेसाठी चांगली असते. अपचण आणि हात पाय सूजणे हे कमी करण्यासाठी हळद काम करते. आतड्यांसाठीही हळद फायदेशीर असते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3. रोगप्रतिकार शक्ती

कच्ची हळद अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल म्हणून काम करते. हळदीच्या सेवनामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हळद दूध प्या. याने रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहतात.

4. वेदनेवर हळद प्रभावी

कच्च्या हळदीत अँटी इंप्लेमेंटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे आपल्याला दुखण्यापासून आराम मिळतो. संधिवात, स्नायू दुखणे यासारख्या आजारांवर हळद खूप चांगला पर्याय आहे. आयुर्वेदात हळदीचा उल्लेख औषध म्हणून केला जातो. त्यामुळे जर तुम्हाला दुखत असेल तर तुम्ही हळद दुध पिऊ शकता आणि आरोग्य सुधारु शकता.

5. त्वचेसाठी फायदेशीर

कच्च्या हळदीमध्ये अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतात. हळदीतील अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी त्वचेवर होणारी जळजळ आणि मुरुम कमी करण्यास मदत करते. तुम्हाला जर पिंपल्स येत असतील तर चेहऱ्यावर हळदीची पेस्ट लावा. त्यामुळे त्वचेवर ग्लो येईल आणि पिंपल्स कमी होतील.

Raw Turmeric Benefits
Magnesium Deficiency: मॅग्नेशियमच्या कमतरतेने जडतील भयंकर आजार; अशी घ्या आरोग्याची काळजी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com