Magnesium Deficiency: मॅग्नेशियमच्या कमतरतेने जडतील भयंकर आजार; अशी घ्या आरोग्याची काळजी
Magnesium Deficiency Care :
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला आपल्या जेवणात काही गोष्टींचा समावेश करायचा असतो. पोषक अन्न, पुरेसे विटामिन आणि मॅग्नेशियम यांमुळे शरीराची योग्य वाढ होते. यापैकी एक घटक जरी कमी असेल तरी त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो. मॅग्नेशियम हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
निरोगी राहण्यासाठी सर्व प्रकारच्या जेवणात अन्नाचा समावेश करणे आवश्यक आहे. मात्र, असंतुलित आहारामुळे शरीराला खूप समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी सर्व घटक शरीरात असणे महत्त्वाचे आहे. त्यातील एक घटक म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचे योग्य प्रमाण शरीरात असणे महत्त्वाचे आहे.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे अनेक प्रॉब्लेम होऊ शकतात. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता झाल्यास त्याला हायपोमॅग्नेसेमिया म्हणतात. मॅग्नेशियमच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मधुमेह, डायरिया असे आजार होतात. तसेच हृदय, हाडे, मेंदू आणि स्नायूंवर याचा परिणाम होतो. त्यामुळे आहारात मॅग्नेशियमचा समावेश करावा.
या समस्या होऊ शकतात
1. मानसिक समस्या
मॅग्नेशियम हे मेंदूसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. मेंदू योग्य पद्धतीने काम करण्यासाठी मॅग्नेशियमची योग्य पातळी असणे आवश्यक आहे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे मानसिक असंतुलन, भावना जाणून न घेणे, नैराश्य, ड्रिपेशन, चिंता अशा समस्या होतात.
2. मसल क्रॅम्प
स्नायूंमध्ये खेचल्यासारखे जाणवणे किंवा मुरगळणे ही मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. स्नायूंच्या योग्य कार्यासाठी मॅग्नेशियम असणे महत्त्वाचे आहे.
3. थकवा जाणवणे
अनेकदा आपल्याला वेगवेगळ्या कारणांनी थकवा जाणवतो. शारिरीक आणि मानसिक थकवा येण्याचे कारण मॅग्नेशियमची कमतरता आहे. स्नायूंमध्ये पॉटेशियमची कमरता कमी असल्यावर मोठ्या प्रमाणात थकवा जाणवतो.
4. उच्च रक्तदाब
उच्च रक्तदाब हे मॅग्नेशियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. यामुळे हृदयाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. अनियमित हृदयाचे ठोके आणि कोरोनरी स्ट्रम्पदेखील होऊ शकतात.
5. हाडे आणि स्नायूंवर परिणाम
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कॅल्शियमची कमतरता देखील होऊ शकते. यामुळे हाडे आणि स्नायूंवर परिणाम होतो. हाडे ठिसूळ होऊ शकतात.
मॅग्नेशियमच्या कमतरतेची काळजी कशी घ्यावी
मॅग्नेशियमच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे. आहारात मॅग्नेशियमचे योग्य प्रमाण असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला काही त्रास होणार नाही.
1. सुका मेवा
मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात अनेक गोष्टींचा समावेश करावा. यात प्रामुख्याने काजू, बदाम या गोष्टी घ्याव्यात. त्याने तुमच्या शरीरा पोषक तत्वे मिळतील.
2. धान्य
तुमच्या जेवणात तुम्ही तांदूळ , क्विनोआ, गव्हाचा समावेश करा. यामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियमचे प्रमाण असते.
3. भाज्या आणि फळे
जेवणासोबतच फळे आणि भाज्या खाणे महत्त्वाचे असते. भाज्यांमध्ये पालक, भेंडी, ब्रोकोली बटाटे या भाज्यांचा समावेश करा. त्याचसोबत फळांमध्ये केळी, अॅवाकॅडोचा समावेश करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.