Indian Air Force Day 2023 :'भारतीय वायुसेना दिन' 8 ऑक्टोबरला का साजरा करतात? वाचा इतिहास आणि महत्त्व

Indian Air Force Day : दरवर्षी भारतात ८ ऑक्टोबर हा दिवस 'भारतीय वायुसेना' दिन म्हणून साजरा केला जाते.
Indian Air Force Day
Indian Air Force Day Saam Tv

Indian Air Force Day History :

दरवर्षी भारतात ८ ऑक्टोबर हा दिवस 'भारतीय वायुसेना' दिन म्हणून साजरा केला जाते. २०२३ मध्ये वायुसेना ९१ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. हवाई दलाचे महत्त्व लोकांना कळावे आणि जनजागृती व्हावी हे यासाठी हा दिवस साजरा केला जात आहे.

भारतीय हवाई दल हा जगातील सर्वात मोठ्या हवाई दलांपैकी एक आहे. देशासाठी हवाई दलांने केलेल्या कामांसाठी हा दिवस साजरा केला जाते. या दिवशी अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. वायुसेना दिनानिमित्त ज्या सैनिकांनी देशासाठी प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.

Indian Air Force Day
Petrol Diesel Prices (8th October) :कच्च्या तेलाच्या किमतीत घरसण; राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग; चेक करा नवे दर

भारतीय वायुसेना दिनाचा इतिहास

भारतीय हवाई दलाची अनेक कामगिरी केल्या आहेत. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची स्थापना युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्सची सहाय्यक कंपनी म्हणून करण्यात आली. भारतीय वायुसेनेने पहिले स्क्वाड्रन तयार केले आणि 8 ऑक्टोबरला ते मिशन पूर्ण केले. त्यानंतर हवाई दलाने अनेक पराक्रम केले.

अल्पावधीतच भारतीय वायुसेना जगातील सर्वात शक्तिशाली वायुसेना बनली. तेव्हापासून 8 ऑक्टोबर हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी वायुसेना दिनाची थीम 'IAF- Airpower Beyond Boundries' अशी आहे.

वायुसेना दिन कसा साजरा करतात?

8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाची अधिकृतपणे स्थापना झाली. या दिवशी हवाई दलात योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे कौतुक केले जाते. भारतातील हवाई दल यादिवशी परेड, एअर शो आयोजित करतात. सर्व सैनिकांचे कौतुक केले जाते. मागील वर्षी कामगिरी केलेल्या सर्व योद्ध्यांना पुरस्कार आणि सन्मान पदके देऊन सन्मानित केले जाते.

Indian Air Force Day
Diabetes Control Tips : रक्तातली साखर कंट्रोल करण्यासाठी या गोष्टीचे सेवन करा, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com