सरकार नेहमी नागरिकांच्या हितासाठी नवनवीन योजना लाँच करत असते. सरकार नेहमी नवीन उद्योजक आणि व्यवसायांना पाठिंबा देत असते. सरकारने अशाच व्यवसाय सुरु करण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.
भारतात गेल्या काही वर्षात स्टार्टअप आणि व्यवसाय सुरू करण्याची संख्या वाढत आहे. अनेकजण स्वतः चा नवीन व्यवसाय सुरू करत आहे. याच उद्योगांना पाठिंबा देण्यासाठी काही सरकारी योजना आहेत. कोणताही व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल महत्त्वाचा असते. त्यासाठी गेल्या काही वर्षात काही सरकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. याच सरकारी योजनांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत..
एमएसएमई कर्ज योजना (MSME Loan Scheme)
उद्योग सुरू करताना भांडवलासाठी सरकारने एमएसएमई लोन योजना सुरू केली आहे. यो योजनेअंतर्गत नवीन उद्योगासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. या कर्जाच्या प्रक्रियेला साधार 8-12 दिवस लागतात. तर कर्जाचा अर्ज मंजूर आणि नाकारण्यासाठी फक्त 59 मिनिटे लागतात.
क्रेडिट गॅरंटी फंड योजना (CGMTSE)
सीजीटीएमएसई (Credit Guarantee Fund Scheme) बऱ्याच काळापासून तारण कर्ज मुक्त सुविधा पुरवते. CGTMSE योजना कोणतेही तारण न घेता 10 लाख रुपयांपर्यंतचे भांडवल कर्ज देते.
प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही प्रामुख्याने महिला उद्योजक, सेवा आणि व्यपाराशी संबंधित उद्योगांना कर्ज देते. या योजनेअंतर्गत कोलैटरल फ्री लोन मिळते. ज्यामध्ये कर्जदाराला परतफेडीचा वेळ वाढवून मिळतो.
यात तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये तुम्ही अर्ज करु शकता.
शिशू मुद्रा योजना - या योजनेत 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज आणि त्यावर 1 ते 2% व्याज आकारले जाते.
किशोर मुद्रा कर्ज - या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 8.60 ते 11.5 टक्के वार्षिक व्याजदराने दिले जाते.
तरुण मुद्रा कर्ज- या योजनेत 5 ते 10 लाखांपर्यंतचे कर्ज 11.5 ते 20% वार्षिक व्याजदाराने दिले जाते.
राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ योजना (NSIC)
या याजनेच दोन प्रकारात कर्ज दिले जाते
विपणन सहायता योजना- या योजनेतून मिळणारा निधी तुम्ही तुमचे बाजारातील मूल्य वाढवण्यासाठी करु शकता. यामुळे तुम्हाला जाहिरात, मार्केटिंग आणि बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करण्यासाठी मदत होईल.
क्रेडिट सहाय्य योजना- या योजनेअंतर्गत तुम्ही कच्चा माल, भांडवल आणि मार्केटिंगसाठी आर्थिक मदत मिळवू शकता.
क्रेडिट-लिंक कॅपिटल सबसिडी योजना
ज्या उद्योगांना तांत्रिक प्रगतीसाठी निधीचा गरज आहे त्यांच्यासाठी क्रेडिट-लिंक कॅपिटल सबसिडी योजना आहे. यात मार्केटिंग, उत्पादन इत्यादींचा समावेश असतो.
SIDBI कर्ज
SIDBI म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सरकारी कर्ज देणारी ही सर्वात जुनी योजना आहे. सीडही कर्ज विशेषतः MSME व्यवसायांना मदत करते. ज्यांना व्यवसायासाठी पैशांची गरज असते. त्यांचायसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे.
टीप- वरील माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. कर्ज घेताना सर्व गोष्टी पडताळून घ्याव्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.