Sneeze Holding Affect On Health: आsssssछीं.!! शिंक आली तर शिंका, अन्यथा श्वसननलिकेचं काही खरं नाही, कारण...

Health News: आपण अनेकदा गर्दीच्या ठिकाणी किंवा बाहेर शिंक आली तर नाक दाबून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, शिंक थांबवणे हे तुमच्या जीवावर बेतू शकतं.
Health
Health Saam Tv
Published On

Holding Sneeze Affect On Health:

आपण अनेकदा गर्दीच्या ठिकाणी किंवा बाहेर शिंक आली तर नाक दाबून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, शिंक थांबवणे हे तुमच्या जीवावर बेतू शकतं. शिंक थांबवणे हे खूप घातक ठरु शकतं. एक केस स्टडीमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमध्ये एका व्यक्तीचा शिंक थांबवल्यामुळे शस्त्रक्रिया झाल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीने शिंक रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा श्वासनलिकेत छेद झाला. त्यानंतर त्याला खूप जास्त त्रास झाला. शिंक थांबवणे हे त्याच्या जीवावर बेतले. त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली.

जर्नल बीएमजे केस स्टडी रिपोर्टनुसार, कार चालवताना ३४ वर्षीय व्यक्तीने शिंक थांबवण्याचा प्रयत्न केला. यात त्याची श्वासनलिकेला छेद पडला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली. यावेळी त्याची मान सुजली होती. त्याला काहीच हालचाल करता येत नव्हती.

डॉक्टरांनी तपासनी केल्यास त्याचा आवाज बदलल्याने आढळून आले. त्या व्यक्तीला श्वास घेताना किंवा जेवण जेवताना त्रास होत होता. तापासात त्याला धुळीची अॅलर्जी असल्याचे समजले. त्यामुळेच त्याला शिंका येत होत्या. त्या दिवशीही त्याला शिंक आली आणि त्याने शिंक थांबवण्याचा प्रयत्न केला.

Health
Women Health : महिलांनो, गर्धधारणेसाठी IVF चा विचार करताय? योग्य वय किती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

त्यानंतर त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर त्याची जखम पूर्णपणे बरी झाली. यातच असं दिसून आलं आहे की, शिंक थांबवणे तुमच्या जीवावर बेतू शकतं. त्यामुळे शिंक थांबवण्याचा प्रयत्न करु नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Health
Tongue Colour: जीभेचा रंग सांगेल तुमचे आरोग्य; कसे ओळखाल?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com