Tongue Colour: जीभेचा रंग सांगेल तुमचे आरोग्य; कसे ओळखाल?

Health News: पाच ज्ञानेंद्रियांपैकी जीभ हा खूप महत्त्वाचा भाग आहे. जीभेमुळे आपण चव घेऊ शकतो. जीभेच्या रंगावरुन तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती मिळते.
Health
HealthSaam Tv
Published On

Tongue Colour Reveals Your Health Status:

आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव हा खूप महत्त्वाचा असतो. प्रत्येक अवयव हा सृदृढ असणे खूप महत्त्वाचे असते. शरीराचा एक भाग जरी कमकुवत झाला तर त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. तसेच त्यामुळे आपल्याला नक्की कोणता आजार आहे हे कळते. आपल्या शरीराचा एक अवयव म्हणजे जीभ. जीभेच्या रंगावरुन तुमचे आरोग्य कसे आहे हे समजते.

पाच ज्ञानेंद्रियांपैकी जीभ एक खूप महत्त्वाचा भाग आहे. जीभेमुळे आपण चव घेऊ शकतो. जीभेच्या रंगावरुन तुम्हाला तुमच्या आरोग्याविषयी महत्त्वाची माहिती मिळते. जिभेच्या रंगावरुन तुम्ही हेल्दी आहात का हे ओळखता येते.

काळी जीभ

जेव्हा तुमच्या जिभेची फिलीफॉर्म पॅपिली लांब आणि बेरंग होतात. तेव्हा तुमची जीभ काळी होते. खराब ओरल हायजिन, धुम्रपान, चहा किंवा कॉफीचे जास्त सेवन यामुळे जीभ काळी होऊ शकते.

निळी किवा जांभळी जीभ

जर तुमची जीभ निळी किंवा जांभळी असेल तर तुमच्या रक्तात ऑक्सिजनची कमतरता असू शकते. यामुळे तुम्हाला कदाचित श्वास घेताना किंवा हृदयासंबंधित समस्या येऊ शकतात. अनेकदा सायनोसिसचे लक्षण देखील असू शकते.

Health
Women Health : महिलांनो, गर्धधारणेसाठी IVF चा विचार करताय? योग्य वय किती? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

पिवळी जीभ

खराब ओरल हायजीन, धुम्रपान किंवा जंक फूड यामुळे जीभ पिवळी होऊ शकते. अनेकदा यकृत किंवा पित्ताशयाच्या समस्यांमुळे जीभ पिवळी होऊ शकते.

लाल जीभ

लाल जीभ असल्यास तुमच्या शरीरात व्हिटामिनची कमतरता असू शकते. बी जीवनसत्त्वे कमी असल्याने जीभेचा रंग लाल होतो. तसेच रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यानेदेखील जीभ लाल होते.

Health
Kark Rashi 2024 : नवीन वर्षात कर्क राशीवर शनी देवाची छाया, आर्थिक स्थिती डगमगेल; प्रेमात येईल दूरावा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com